आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शार्क माशासारखे डिझाइन केले आहेत या गाडीचे अनेक पार्ट्स, 7-8 सीटर गाडीत होते कनव्हर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - महिंद्र नवी मल्टी पर्पज व्हेइकल (MPV) मराजो (Marazzo) पुढच्या महिन्यात 3 सप्टेंबरला लाँच करणार आहे. या दमदार कारच्या इंटेरियरचे फोटो रिलीज केले आहेत. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणझे ही गाडी 7 आणि 8 सीटरमध्ये कनव्हर्ट करता येते. मराजोचा अर्थ शार्क असा आहे. त्यामुळे कंपनीने या गाडिचे डिझाइनही शार्कसारखे केले आहे. 


पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटची गाडी 
मराजो महिंद्राची पॅसेंजर व्हेइकल सेगमेंटची गाडी आहे. ही कार प्रथमच चेन्नईतील रिसर्च व्हॅली आणि नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटरने एकत्रितपणे तयार केली आहे. या एमपीव्हीच्या इंटेरियर आणि एक्सटीरियरमध्ये अनेक पार्ट्स शार्कच्या आकारातील आहेत. कंपनीने सध्या याबाबत फार माहिती दिलेली नाही. पण या कारची किंमत 10 लाखांपासून पुढे असेल. 


1.5 लीटरचे इंजिन 
महिंद्राच्या या MPV मध्ये 1.5 लीटरचे डिझेल इंजिन आहे. तसेच 121 हॉर्सपावरची शक्ती आणि 300 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट केले जाते. त्यात 6 स्पीड गीअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारच्या सर्व व्हेरीएंट्समध्ये सेफ्टीसाठी एअरबॅग्स ABS, EBD, रियर पार्किंग सेंसर असे फिचर्स आहेत. 


हे फिचर्स असणार 
गाडीमध्ये फोल्डेबल सीट असतील. त्यात ब्लैक कलरचे टी-शेपचे डॅशबोर्ड आहे. ते फॉक्स अॅल्युमिनियमयुक्त आहे. 7.0 इंचाचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अॅटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, AC व्हेंट्स असे अॅडव्हान्स फिचर्स मिळतील. त्याचबरोबर  स्टेअरिंग माऊंटेड ऑडियो कंट्रोल्स, प्रोजेक्टर हेडलॅम्प, डेटाइम रनिंग लाइट्स असे हायटेक फिचर्सही मिळतील. 


पुढे पाहा, Mahindra Marazzo च्या इंटेरियरचे काही PHOTOS.. 

बातम्या आणखी आहेत...