आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची ही नवीन कार देणार तब्बल 140 किमीचे मायलेज; 2019 मध्ये येणार बाजारात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : महिंद्रा कंपनीची इलेक्ट्रिक कार SUV KUV100 EV पुढच्या वर्षी (2019) भारतात लॉन्च होणार आहे. या SUV कार मध्ये नवीन टेकनॉलॉजीच्या बॅटरीचा उपयोग केलेला आहे ज्यामुळे ही बॅटरी कमी वेळेत चार्ज होते आणि जास्त वेळ टिकते. कंपनीची अशी खात्री आहे की, ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 120-140 km पेक्षा जास्त अंतर पार करू शकते. 

 

100 km असेल सर्वाधिक स्पीड...
महिंद्राची यापूर्वीच eVertio कार भारतात विक्री होत आहे. आता ही नवी SUV KUV100 EV कारसुद्धा 72 व्होल्टेज LFP प्लॅटफॉर्मसोबत मिळणार आहे. या कारचे इंजिन 40.2bhp ची पॉवर जनरेट करेल. कारची सर्वाधिक स्पीड 100 km प्रति तास असू शकेल. महिंद्राची रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम या बॅटरीला अशाच पद्धतीने विकसित करत आहे ज्यामुळे 0-80 टक्के चार्जिंगमध्ये या कारला एका तासापेक्षा कमी वेळ लागू शकेल. मात्र कंपनीने या कारच्या डिझाईनबद्दल जास्त काही उघड केलेले नाही. 

 

कारच्या इंटेरिअरमध्ये मिळतील उत्तम फीचर्स...
महिंद्राच्या या नव्या SUV मध्ये नवीन पद्धतीचे अलॉय व्हील्स असतील. नवीन हेडलाईतसोबतच नव्या डिझाईनचे बम्परही असेल. या व्यतिरिक्त कारच्या इंटीरिअरमध्ये टचस्क्रिन इंफोटेंमेंट सिस्टम, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, रिझर्व्ह कॅमेरा आणि सेन्सर पार्किंग हे फीचर्सही असतील. या कंपनीचे एक मोबाईल अप्लिकेशनही उपलब्ध असेल. ज्यामध्ये लाईव्ह रेंज, पार्किंग लोकेशन आणि अजून बऱ्याच सुविधा असतील.

बातम्या आणखी आहेत...