आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राची नवी सुप्रो मिनी ट्रक व्हीएक्स बाजारात दाखल; ही मजबूत गाडी ९०० किलो वजन वाहून नेऊ शकते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -| देशातील प्रख्यात महिंद्रा अँड महिंद्रा समूहाने आपली नवी गाडी सुप्रो मिनी ट्रक व्हीएक्स बाजारात दाखल केली आहे. ही नवी सुप्रो व्हीएक्स ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सुप्रो मिनी ट्रकचाच एक भाग आहे. नव्या वैशिष्ट्यांसह बाजारात आलेली सुप्रो व्हीएक्स ४.४ लाख रुपये या किमतीत महिंद्राच्या पुण्यातील जुन्या शोरूममध्ये उपलब्ध आहे. सुमारे २०.७ अब्ज अमेरिकन डॉलरच्या महिंद्रा ग्रुपचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा प्रा. लिमिटेडने हे नवे उत्पादन बाजारात उतरवले आहे. नवा सुप्रो व्हीएक्स शहरांतील व्यवसायाची गरज ओळखून तयार केली आहे. यात शक्तिशाली डीआय इंजिन आहे, जे गाडीला हेवी लोडमध्येही बहाल करते २५ एचपीची पिकअपची शक्ती. ही मजबूत गाडी ९०० किलो वजन वाहून नेऊ शकते. सुप्रो व्हीएक्सचे १३ इंच मोठे टायर आहेत. कमी इंधन लागत असल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, असे महिंद्राचे बिझनेस हेड सतींदरसिंग बाजवा म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...