महिंद्राची एक्सयूव्ही-300 लाँच, / महिंद्राची एक्सयूव्ही-300 लाँच, किंमत 7.90 लाख रुपयांपासून; जाणून घ्या कारचे फिचर्स

Feb 15,2019 09:38:00 AM IST

मुंबई- महिंद्रा अँड महिंद्राने गुरुवारी प्रीमियम मॉडेल एक्सयूव्ही-५०० चे लोअर मॉडेल एक्सयूव्ही-३०० लाँच केले आहे. या गाडीची किंमत ७.९० लाखांपासून ते ८.४९ लाख रुपयांपर्यंत आहे. एक्सयूव्ही-३०० गाडी १.२ लिटर पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेलमध्ये उपलब्ध असेल. ही गाडी चार मीटरपेक्षा कमी लांबीच्या एक्सयूव्ही श्रेणीमध्ये फोर्ड इको स्पोर्ट, मारुती विटारा ब्रेझा आणि टाटा नेक्सनसारख्या गाड्यांना स्पर्धा देईल.

महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, ही गाडी सांगयोंगच्या एक्स-१०० प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कोरियन तंत्रज्ञान आणि भारतीय इनोव्हेशन मिळून तयार करण्यात आलेली गाडी आहे. २०११ मध्ये लाँच झाल्यानंतर एक्सयूव्ही-५०० ला ज्याप्रमाणे प्रतिसाद मिळाला तसाच चांगला प्रतिसाद एक्सयूव्ही-३०० ला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कंपनीने मराजो आणि अल्टुरास जी-४ नावाच्या गाड्याही लाँच केल्या होत्या.

X