आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहोबा(उत्तर प्रदेश)- अभिनेता अनिल कपूरचा चित्रपट नायक तुम्ही पाहिला असेलच. चित्रपटाच मुख्यमंत्र्याचे पात्र साकारणारे अमरेश पुरी अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री बनवतात. असाच काहीसा प्रकार महोबाच्या चरखारी मतदार संघात झाला आहे. चरखारीचे आमदार ब्रजभूषण राजपूतने फिल्मी अंदाजात 5 वर्षाच्या मुलाला आमदार बमवले, आणि त्याला आपली गाड़ी, गनर आणि सचिव त्याच्या सोबत दिले. मुलानेही एका आमदाराप्रमाणे सगळ्या लोकांच्या समस्या ऐकल्या.
- आपल्या अपंग मुलाला आमदार बनलेले पाहून त्याच्या आई-वडीलांना आनंदाश्रु अनावर झाले. त्या छोट्या आमदाराने पंचायतीत बसून लोकांच्या समस्या ऐकल्या, आणि त्यांचे अर्जही स्वीकारले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात नेले, जिथे पोलिस आधिकाऱ्याने त्या छोट्या आमदाराला त्यांच्या खुर्चीवर बसवले.
- या छोट्या आमदाराचे नाव अरुण अहिरवार आहे. अरुण जन्मापासून बोलू शकत नाही. पण आपल्या मुलाला आमदार झालेल पाहून त्याचे आई-वडील खुप खुश झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.