आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजविरुद्ध माेठा विजय; 224 धावांनी भारताने जिंकला सामना: गुरुवारी पाचवा वनडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राेहित शर्मा (१६२) अाणि अंबाती रायडू (१००) यांच्या झंझावाती द्विशतकी भागीदारीपाठाेपाठ कुलदीप यादव (३/४२) अाणि खलील अहमदच्या (३/१३)धारदार गाेलंदाजीच्या बळावर भारताने साेमवारी करिअरमध्ये सर्वात माेठ्या तिसऱ्या विजयाची नाेंद केली. यजमान भारताने चाैथ्या वनडेत पाहुण्या विंडीजवर २२४ धावांनी मात केली. यासह भारताचाहा तिसरा सर्वात माेठा विजय ठरला. या विजयाच्या बळावर भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने अाघाडी घेतली. अाता मालिकेतील पाचवा अाणि शेवटचा वनडे सामना गुरुवारी तिरुअनंतपुरममध्ये हाेईल. 


टीम इंडियाने यंदाच्या सत्रात सर्वात माेठा स्काेअर उभा केला. भारताने  ५ बाद ३७७ धावा काढल्या. प्रत्युत्तरात विंडीजचा ३६.२ षटकांत १५३ धावांवर  खुर्दा उडाला. 

 

राेहित-रायडूची द्विशतकी भागीदारी : जबरदस्त फाॅर्मात असलेल्या राेहित शर्माने अापला झंझावात कायम ठेवताना शानदार शतक ठाेकले. याशिवाय त्याने अंबाती रायडूसाेबत तिसऱ्या गड्यासाठी द्विशतकी भागीदारी रचली. त्यांनी २११ धावांची माेठी भागीदारी केली.  नुर्सने हेमराजकरवी राेहितला बाद केले. 

 

१९८ षटकार, राेहितने सचिनला टाकले मागे
सलामीवीर राेहितने शतकी खेळीदरम्यान चार उत्तुंग षटकार खेचले. यासह त्याच्या नावे वनडेत १९८ षटकारांची नाेंद झाली. यात त्याने सचिनलाही मागे टाकले. या फाॅरमॅटमध्ये सर्वाधिक षटकारांच्या यादीत राेहितने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. सचिनच्या नावे १९५ षटकारांची नाेंद अाहे. याशिवाय त्याने अाता धाेनीशी (१९८)  बराेबरी साधली. अाता त्यााला धाेनीलाही मागे टाकण्याची संधी अहे. 

 

बातम्या आणखी आहेत...