Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | main aurat hoon marathi drama soygaon

‘मैं अाैरत हूँ’ नाटक साेयगावातील किशाेरवयीन मुलींशी साधणार संवाद

प्रतिनिधी | Update - Feb 25, 2019, 10:13 AM IST

सोयगाव तालुक्यात किशोरवयीन मुलींना ज्या मनस्तापाला तोंड द्यावे लागले त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या पुढाकारातून

 • main aurat hoon marathi drama soygaon

  औरंगाबाद - सोयगाव तालुक्यात किशोरवयीन मुलींना ज्या मनस्तापाला तोंड द्यावे लागले त्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या पुढाकारातून, जळगाव येथील अस्मिता फाउंडेशनच्या वतीने ‘मौन सोडू, चला बोलू’ असे संवाद अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अभियानाचे उद्घाटन सोयगाव (जि. औरंगाबाद) येथील बचत भवन सभागृहात येत्या एक मार्चला सकाळी ११ वाजता होत आहे.


  या संवाद सत्रात ‘मैं औरत हूँ’ या नाटकाद्वारे मुलींशी संवाद साधला जाईल. या नाटकाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. प्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित, दिग्दर्शित हे नाटक प्रस्थापित नाटक नाही. ‘थिएटर ऑफ रिलिव्हन्स’ या स्कूलमधील हा नाट्यप्रयोग असून किशोरवयीन मुली आणि त्यांचे पालक- शिक्षक हे नाटक पाहून मौन सोडतील आणि खऱ्या अर्थाने बोलतील, अशी अपेक्षा आहे.


  देशभरात या नाटकाचे १९९८ पासून १००० हून जास्त प्रयोग झाले आहेत. या माध्यमातून कलाकारांनी सामाजिक स्तरावर नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत. विशेषत: स्त्री अस्तित्वावर भाष्य करून कितीतरी महिलांना स्वतःबद्दल, अस्तित्वाबद्दल विचार करण्यासाठी प्रेरित केले. हा नाट्यप्रयाेग पाहून वेगवेगळ्या स्तरांवरील महिलांना-मुलींना जगण्याचा नवीन दृष्टिकोन मिळाला आहे. शुक्रवारी सोयगाव येथे होणाऱ्या ‘मौन सोडू, चला बोलू’ अभियानात हे नाटक सादर केले जाणार आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या दिग्दर्शनाखाली अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर आणि तुषार म्हस्के हे कलाकार हा प्रयाेग सादर करतील.


  बंधन, परंपरांना खुले आव्हान देत स्वअस्तित्वाचा शोध
  ‘मैं औरत हँू!” हे नाटक आपल्या असण्याची, त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या “अस्तित्वाला’ विभिन्न स्वरूपात पडताळण्याची, शोध घेण्याची एक यात्रा आहे. तसेच पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता, बंधन, परंपरा, समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ स्वीकारते. हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’च्या स्वतंत्र मानवी अस्तित्वाला रेखांकित आणि अधोरेखित करते.
  - सायली पावसकर, नाटकातील कलाकार

Trending