आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नराधमांची नावे बदलली, विकृती कायम; राज्यात एकतर्फी प्रेमातून हत्येचे मोठे प्रकरण घडले ते १९९० मध्ये

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • एकतर्फी प्रेमातून हत्या : प्रमुख घटना
 • उल्हासनगरला रिंकू पाटील हिची १० वीच्या परीक्षा केंद्रात घुसून हत्या करण्यात आली

मुंबई - राज्यात एकतर्फी प्रेमातून हत्येचे मोठे प्रकरण घडले ते १९९० मध्ये. उल्हासनगरला रिंकू पाटील हिची १० वीच्या परीक्षा केंद्रात घुसून हत्या करण्यात आली. त्यानंतर  विद्या प्रभुदेसाई , अमृता देशपांडे, प्राची झाडे...अशा हत्या झाल्या. ते करणाऱ्या नराधमांची नावे बदलत राहिली. मात्र, समाजातील ही विकृती कायम असल्याचे हिंगणघाटच्या घटनेवरून दिसले.

एकतर्फी प्रेमातून हत्या : प्रमुख घटना 

 • 30 मार्च 1990 : उल्हासनगर : रिंकू पाटील हिला १०वीच्या परीक्षा केंद्रातच पेट्रोल टाकून जाळले.
 • 1992 : मुंबई सेंट्रल येथे विद्या प्रभुदेसाई हिची अमानुष हत्या. भरदिवसा तिला रस्त्यात जाळण्यात आला.
 • 1992 : कांदिवलीच्या एका गुजराती तरुणीवर तिच्या नातेवाईक तरुणाने अ‍ॅसिड फेकले.
 • 1998 : सांगलीत एकतर्फी प्रेमातून 18 वर्षीय अमृता देशपांडेची बस स्थानकाजवळ हत्या.
 • 2009 : सात वर्षांपूर्वी डोंबिवलीत आपले प्रेमप्रकरण मुलीच्या घरी सांगणाऱ्या रूपाली पाटीलला दोघा शाळकरी विद्यार्थ्यांनी जिवंत जाळले.
 • 2011 : नांदूरघाट (जि.बीड) येथे साधना जाधव या तरुणीला घरात घुसून जीवंत जाळले.
 • 2018 : सावळ (जि. वाशिम) 18 वर्षीय तरुणीला जाळून मारले.
 • 2018 : मुंब्य्रात एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची हत्या.
 • जुलै 2019 : अमरावती : भररस्त्यात तरुणीची हत्या.
 • नोव्हें. 2019 : मुंबईतील तलासरी येथे १५ वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या, मृतदेह जाळला.
 • जाने. 2020 : धामणगाव रेल्वे शहरात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या.