Train Accident / मेंटेनंस टॉवर कार आणि समलेश्वरी एक्सप्रेसमध्ये जोरदार टक्कर, आग लागून 2 जण जिवंत जळाले, तर एकाचा खाली पडून मृतू


ट्रेनची कपलिंग तुटल्याने आग प्रवाशांच्या बोगीपर्यंत गेली नाही, सर्व प्रवासी सुरक्षित

दिव्य मराठी वेब

Jun 26,2019 03:21:00 PM IST

रायगडा(ओडिसा)- येथील हावडावरून जगदलपूरला जात असलेल्या समलेश्वरी एक्सप्रेसचा मोठा अपघात जाला. रेल्वे लाइनच्या दुरुस्तीसाठी लावलेल्या टॉवर कारसोबत ट्रेनची मंगळवारी ओडिसाच्या रायगडा जिल्ह्यात केउटगुडाजवळ जोरदार टक्कर झाली, त्यानंतर टॉवर कार आणि रेल्वे इंजिनमध्ये आग लागली. यात टॉवर कारच्या तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पण ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

टॉवर कारमध्ये 7 जण होते, ज्यातील 4 कर्मचाऱ्यांनी रेल्वेची टक्कर झाल्यानंतर उडी मारली. पण यातील रायगडाचे सीनियर सेक्शन इलेक्ट्रिकल इंजीनिर सागर आणि टेक्नीशिअन इलेक्ट्रिकल गौरी नायडू टॉवर कारमध्येच जिवंत जळाले, तर एक मेंटेनेंस टेक्नीशिअन सुरेश हे बाहेर रेल्वे रुळावर पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर आग लागली आणि धुराचे लोट उठले, त्यानंतर लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांची पाहणी केली. या अपघातात एसएलआरमध्ये बसलेले रेल्वे ड्रायव्हर वेंकटेश यांच्या पाय तुटला.


दोन डब्बे रुळावरून घसरले
समलेश्वरी एक्सप्रेस रायगडावरून कोरापूट मार्गे जगदलपूरकडे रवाना झाली. सिंगापूर रोड स्टेशनवरून ट्रेनला सिग्नल मिळाल्यानंतर ड्रायव्हरने ट्रेनचा वेग वाढवला. पण, ही ट्रेन केउटगुडा पोहण्याअधीच रेल्वे लाइनवर दुरुस्तीसाठी आलेल्या टॉवर कारसोबत धडकली. समलेश्वरी एक्सप्रेसच्या ड्रायव्हरने समोर टॉवर कारला पाहून इमरजंसी ब्रेक लावले. यामुळे इंजिनला बोगीसोबत जोडणारे कपलिंग तुटले. त्यानंतर इंजिनच्या मागे लावलेला एसएलआर आमि जनरल कोच रुळावरून खाली उतरले. त्यानंतर रेल्वेच्या इलेक्ट्रिक इंजिन आणि टॉवर कारमध्ये आग लागली. संध्याकाळी दुसऱ्या एका इंजिनच्या मदतीने समलेश्वरी एक्सप्रेसला रायगडाला परत आणले.


स्टेशन मास्टरला निलंबित केले
समलेश्वरी एक्सप्रेसच्या सगळ्या प्रवाशांना बसच्या मदतीने कोरापूट आणि जगदलपूरला पाठवण्यात आले. या अपघातासाठी जबाबदार असलेल्या केउटगुडा आणि सिंगापूर रोडच्या स्टेशन मास्टरला निलंबित करण्यात आले आहे. अपघातानंतर रायगडा-कोरापूट रेल्वे मार्गावर रेल्वे प्रवास काही तासांसाठी बंद करण्यात आला.

X
COMMENT