आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रेय फसवणूक : मालमत्ता विकून देणार ठेवीदारांचे पैसे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मैत्रेय कंपनीकडून झालेल्या फसवणूक प्रकरणात फसलेल्या ठेवीदारांना संचालकांची मालमत्ता विकून पैसे देण्यात येणार आहेत. त्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून देशभरातील मैत्रेयची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 


औरंगाबाद जिल्ह्यातही कांचनवाडी परिसरात मैत्रेयची दोन हेक्टर ९६ गुंठे जमीन आहे. शिवाय उस्मानपुरा, समर्थनगर आणि सिल्लोड येथेदेखील मैत्रेयचे कार्यालय आहे. या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता फसलेल्या ठेवीदारांनी थेट पोलिस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र फॉर्म तयार करण्यात आले आहेत. शिवाय सोबत पॉलिसी डॉक्युमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँकेचे कागदपत्र जमा करण्याचे आवाहन पोलिसांकडून ठेवीदारांना करण्यात आले आहे. मैत्रेय कंपनीचे देशभरात २८ लाख ठेवीदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...