आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-ऑटोचा एवढा भीषण अपघात की, पाहणाऱ्यांचाही उडाला थरकाप, आठवडी बाजार करून परतताना काळाचा घाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरजपूर (छ.ग.)  - बायपास वळणावर बुधवारी संध्याकाळी हायवा ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक झाली. ह अपघात एवढा भीषण होता की, 4 जण जागेवरच ठार झाले. 4 महिला आणि इतर 5 जखमी आहेत. त्यातीलही 4 जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

प्रत्यक्षदर्शी म्हणाले की, धडक एवढी जबरदस्त होती की, ऑटोच्या अक्षरश: चिंधड्या उडाल्या. यात 2 जणांचे ऑटोतच मृतदेह फसले. ते मोठ्या मुश्किलीने कटरच्या साहाय्याने पत्रा कापून बाहेर काढता आले.

 

बुधवारी संध्याकाळी सूरजपूरचा आठवडी बाजार करून ऑटोमधून गावकरी घरी परतत होते. तेवढ्यात बायपास वळणावर समोरून भरधाव ट्रक (सीजी 29 ए 1470) ने त्यांना जोरदार धडक दिली. पाहता-पाहताच आरडाओरड सुरू झाली. धडक एवढी भीषण होती की, ऑटोच्या चिंधड्या उडाल्या. समोर बसलेले प्रवासी त्यातच फसून बसले. नंतर कटरच्या साहाय्याने त्यांचे मृतदेह बाहेर काढता आले. या दुर्दैवी अपघातानंतर गावावर शोककळा पसरली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या भीषण अपघातचे आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...