Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died

साक्रीत विचित्र अपघात.. बसमागून आलेल्या भरधाव ट्रेलरची पिकअपला जोरदार धडक, चालक ठार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 12, 2019, 05:17 PM IST

सुनील हा एकुलता एक मुलगा असून घरातील कर्ता पुरुष होता. याचबरोबर तो निर्व्यसनी व काबाळकष्ट करून प्रामाणिकपणे काम करणारा

 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died

  साक्री- शहरातील हॉटेल अमित समोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी सकाळी एसटी बस, ट्रेलर आणि पिकअपचा विचित्र अपघात झाला. या अपघातात पिकअप चालकाचा जागेवर मृत्यू झाला. सुनील शांताराम मुसळे (रा.पिंपळनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हॉटेल अमितसमोर सकाळी 8 वाजून 10 मिनिटांला मालेगाव- साक्री ही बस थांबली. प्रवाशी खाली उतरत असताना बसमागून आलेला भरधाव ट्रेलर समोरून येणार्‍या पिकअपला जोरदार धडक देत रस्त्याच्या विरुद्ध बाजुला असलेल्या जॉनस कंपनीचेच्या शोरुमसमोरील लोखंडी बोर्डास धडकला. अपघातात पिकअप चालकाचा जागेवर मृत्यू झाला. अपघातापनंतर ट्रेलरचा चालक फरार झाला. ट्रेलर चालकाविरुद्ध साक्री पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  एकुलता एक मुलगा असून घरातील कर्ता पुरुष गेला

  सुनील शांताराम मुसळे त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व एक मुलगी असून लहान मुलगा केवळ दोन महिन्यांचा आहे. सुनील हा एकुलता एक मुलगा असून घरातील कर्ता पुरुष होता. याचबरोबर तो निर्व्यसनी व काबाळकष्ट करून प्रामाणिकपणे काम करणारा होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असल्याने सुनीलचे वडील शांताराम मुसळे हे देखील हातगाडी चालवून थोडीफार मदत करत होते. सुनीलच्या अपघाती निधनामुळे कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सुनीलच्या वयोवृद्ध वडिलांवर आली आहे. याघटनेमुळे संपूर्ण पिंपळनेर गाव परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

  राम हॉटेल परिसरात एस टी बस थांबा आहे. याठिकाणी धुळे व नंदुरबार कडून येणाऱ्या व जाणाऱ्या एस टी बस प्रवाश्यांसाठी थांबत असतात. याठिकाणी सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग लगत असलेली रस्त्याची साईडपट्टी खूप खोल असल्याने बस चालक रस्त्यावरच बस थांबवत असतात. जर याठिकाणी रस्त्याची साईडपट्टी दुरुस्त करून रस्त्याला समांतर राहिली असती तर वाहनांना उभे राहण्यासाठी जागा झाली असती. परिणामी हा अपघात घडलाच नसता. अशी माहिती परिसरातील स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली.

  राम हॉटेल बसथांबा परिसरात सकाळी अनेक महिला व पुरुष प्रवासी वाहनांची वाट बघत थांबलेले असतात. परंतु सुदैवाने आज एकच प्रवासी याठिकाणी थांबलेला होता आणि तो ही या अपघातात थोडक्यात बचावला. अन्यथा अपघातातील चित्रण बघितल्यास हा प्रवासीही ट्रालाच्या खाली आला की काय असे प्रथमदर्शनी वाटत होते.

  सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम तीन ते चार महिन्यांपासून बंद पडले आहे. जर साक्री लगतच बायपास महामार्ग चालू झाला असता तरी हा अपघात घडला नसता म्हणून लवकरात लवकर महामार्गाचे काम पूर्ण करून अपघातांची मालिका थांबवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. कसा झाला हा विचित्र अपघात.. व्हिडिओ आणि फोटो..

 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died
 • Major Accident in Sakri Dhule pickup Driver Died

Trending