आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Major Deep Singh, Who Lost His Leg In The Kargil War, Watch The Film 'Sarfarosh' After 20 Years, Amir Said, 'salute To You'

करगिल वॉरमध्ये पाय गमावलेले मेजर डीपी सिंह यांनी 20 वर्षांनंतर पहिला चित्रपट 'सरफरोश', आमिर म्हणाला - 'तुम्हाला सलाम'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : आमिर खानची हिट फिल्म 'सरफरोश' रिलीज होऊन 20 वर्षे झाली आहेत. 'सरफरोश' 30 एप्रिल 1999 ला रिलीज झाली होती. देशभक्तीच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. अशातच कारगिल वॉरमध्ये देशासाठी आपला पाय गमावणारे रिटायर्ड मेजर डीपी सिंह यांनी फिल्मशी निगडित काही आठवणी ट्विटरवर शेअर केल्या. या पोस्टवर आमिर खानने मेजर यांच्या पोस्टला उत्तर दिले.  

 

मेजर डीपी सिंहने लिहिले, '20 वर्षांपूर्वी आमिर खानचा चित्रपट 'सरफरोश' पहिला आणि परत मी हा चित्रपट पहिला. पण त्यावेळी मी हा चित्रपट थिएटरमध्ये पहिला होता आणि यावेळी टीव्हीवर पहिला. त्यावेळी माझे पाय होते आणि यावेळी एक पाय कमी आहे. ऑपरेशन विजयचे युनिट जॉइन करण्यापूर्वी हा माझा चित्रपट शेवटचा होता. जो मी दोन्ही पायांसोबत पहिला होता.'

 

"Exactly 20 years ago I watched movie #Sarfarosh of @aamir_khan and same I did just now.

 

But

 

That time it was in theater.
Now on TV.

 

That time on both legs.
Now one less.

 

My last movie as intact before I joined unit for #OpVijay in May 1999.#memories pic.twitter.com/rBmWtnhRX5"

 

 

आमिरने ट्वीटचा रिप्लाय देत लिहिले, 'डियर मेजर डीपी सिंह, तुमच्या पोस्टने माझ्या अंगावर एकटा आला. आम्हाला तुमचे साहस, हिम्मत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्येही धीर ठेवण्यासाठी सलाम करतो आहे.'

 

"Dear @MajDPSingh, your post gave me goosebumps.
We salute your courage, strength and grit in the face of adversity.
Love and respect to you, Sir.
a. https://t.co/TYL8qurl1v"

 

 

कृत्रिम पायासोबत 18 मॅरेथॉनमध्ये त्यांनी घेतला आहे भाग...  
1999 मध्ये मेजर डीपी सिंह अखनूर सेक्टरमध्ये LOC जवळ जखमी झाले होते. या घटनेत त्यांनी त्यांचा एक पाय गमावला. त्यांना कृत्रिम पाय बसवला गेला आहे. पण पाय गमावल्यांनंतरही त्यांच्या धैर्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. ते आपल्या कृत्रिम पायासोबत 18 मॅरेथॉनमध्ये आपली हजेरी लावली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मेजर यांचे नाव 'पीपल ऑफ द ईयर 2016' मध्ये सामील आहे.