Home | International | Other Country | Major Earthquake Hits Japans Hokkaido Several Dead Many Injured Breaking News And Updates

जपानमध्ये 6.7 तीव्रतेचा भूकंप, एक ठार, 20 जखमी; भूस्खलनामुळे घरांचे नुकसान, 20 बेपत्ता

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 09:13 AM IST

जपानच्या उत्तरेतील द्वीप होक्काइडोमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे मोठे धक्के जाणवले.

 • Major Earthquake Hits Japans Hokkaido Several Dead Many Injured Breaking News And Updates

  टोकियो - जपानच्या उत्तरेतील द्वीप होक्काइडोमध्ये गुरुवारी पहाटे भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर तीव्रता 6.7 नोंदवण्यात आली. एक जण ठार झाला आहे. तर 20 हून जास्त जण जखमी झाले आहेत. स्थानिय माध्यमांनुसार, होक्काइडोमध्ये भूकंपानंतर भूस्खलनामुळे घरांचे नुकसान झाले आहे. 20 हून जास्त जण बेपत्ता आहेत.

  अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या रिपोर्टनुसार, भूकंपाचे केंद्र होक्काइडोचे मुख्य शहर सप्पोरोपासून 68 किलोमीटर दूर दक्षिण पूर्वेत होते. भूंकपानंतर अनेक भागांतील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. सरकारी टीव्ही एनएचकेच्या रिपोर्टमध्ये शहराच्या जवळील डोंगराळ भागतील भूस्खलनानंतर 10 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

  रेल्वे सेवा रोखण्यात आली, एअरपोर्टही बंद:
  होक्काइडो परिसरातील मेट्रो सेवाही प्रभावित झाली. भूकंपामुळे होक्काइडो आणि न्यू चिटोस एअरपोर्टचेही नुकसान झाले आहे. सूत्रांनुसार, दोन्ही एअरपोर्टवर गुरुवारी सेवा बंद राहतील.

  जेबी वादळामुळे 10 ठार:
  जपानमध्ये मंगळवारी जेबी वादळाने मोठा विध्वंस घडवला. हे जपानमध्ये 25 वर्षांतील सर्वात शक्तिशाली वादळ होते. यात 10 जणांचा जीव गेला आणि 150 हून जास्त जण जखमी झाले होते. या वादळामुळे 12 लाख जण प्रभावित झाले होते.

Trending