आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या सेटवर लागली भीषण आग, आगीत सगळे साहित्य जळून झाले खाक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः गुजरात येथील उमरगांवमध्ये आगामी टीव्ही मालिका 'राधा-कृष्ण'च्या सेटला भीषण आग लागली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीत सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही, पण निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निर्मात्यांनी उमरगांवमध्ये वृंदावनचे दोन सेट लावले होते. या भीषण आगीत हे दोन्ही सेट जळून खाक झाले आहेत. निर्मात्यांचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे. बातम्यांनुसार, निर्मात्यांनी इंश्योरन्स केला होता, पण काही फॉर्मेलिटीजमुळे त्यांना पैसे मिळणे कठीण आहे.

 

सर्वात महागडा सेट...

रिपोर्ट्सनुसार, हा इंडियन टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात महागडा सेट होता. या मालिकेत अभिनेता सुमेध मुदगलकर कृष्णाची भूमिका साकारत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून ताप असल्याने तो रुग्णालयात दाखल आहे. सिद्धार्थ तिवारी या मालिकेते निर्माते आहेत. ही मालिका राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमावर आधारित आहे.

 

- ही मालिका स्टार भारत चॅनलवर येत्या 24 सप्टेंबरपासून दाखल होत असून रात्री 9 वाजता प्रसारित केली जाणार आहे. 

 

- मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत सुमेध मुदगलकर तर राधाच्या भूमिकेत मल्लिका सिंह आहे.

 

- मिळालेल्या माहितीनुसार, शोची नॅरेटप प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आहे. या मालिकेचे एकुण बजेट 15 कोटींच्या घरात आहे.

 

Human life is of utmost value for us! Everything is under control and all are safe! Thank you for all the concern pouring in! #RadhaKrishn #Swastik

— SiddharthKumarTewary (@sktorigins) September 20, 2018

 

ट्वीट करुन दिली बातमी...
निर्माते सिद्धार्थ तिवारी यांनी या घटनेची माहिती ट्वीट करुन दिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, काही गोष्टी नियंत्रणात नसतात. आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...