यावलमध्ये गादी भंडारला / यावलमध्ये गादी भंडारला भीषण आग, लाखोंचे नुकसान; अन्यथा परिसरातील अनेक घरे आली असती भक्ष्यस्थानी

प्रतिनिधी

Mar 02,2019 07:26:00 PM IST

यावल- शहरातील सुदर्शन चौकांमध्ये असलेल्या ताज गादी भंडार या दुकानाला अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. वेळेतच नगरपालिकेच्या अग्निशमन वाहनाने आगीवर तात्काळ नियंत्रणात आणले. अन्यथा त्या संपूर्ण परीसरातील अनेक घरेही जळून मोठी हानी झाली असती.

शहरातील सुदर्शन चौकात ताज गादी भांडार हे गाद्या व उशा तयार करण्याचे शेख रफीक शेख कादर पिंजारी यांचे दुकान आहे. शनिवारी दुपारी दीड वाजता ते जेवणासाठी दुकान बंद करून गेले असता दुकानातून धूर निघताना नागरिकांनी पाहिले. नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानात आत ठेवलेला कापूस आणि तयार गाद्यांना आग लागलेली होती. काही क्षणात आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. नागरिकांनी तत्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती कळवली. अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व आग नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आले. गादी भांडारला लागून आजुबाजू मोठ्या प्रमाणावर रहिवासी घरे आहेत. या घटनेमुळे वेळीच आग आटोक्यात आणल्ल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, या दुर्घटनेत पिंजारी यांच्या तयार गाद्या व गादी तयार करण्यास लागणारी रुई आणि मशीन असे सुमारे एक लाखाहून जास्त नुकसान झाले आहे.


शॉर्टसर्किटमुळे आग?
दुकानात असलेल्या विद्युत उपकरणात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. आधीच या संदर्भात महसूल विभागाने पंचनामा केला जात आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

X
COMMENT