Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Major Fire to Geetanjali Express Near jalgaon

जळगावजवळ गीतांजली एक्स्प्रेसला आग, गेटमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 11, 2019, 05:10 PM IST

आग लागल्याचे लक्षात येताच एक्स्प्रेस शिरसोली रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

 • Major Fire to Geetanjali Express Near jalgaon

  जळगाव- मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेस या सुपरफास्ट गाडीच्या सर्वात शेवटी असलेल्या पाॅवर काेचला साेमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिरसाेली रेल्वेस्थानक पास करीत असतांना अचानक अाग लागली. अाग लागल्याचे लक्षात अाल्याने तत्काळ गाडी थांबविण्यात येवुन अाग अाटाेक्यात अाणण्यात रेल्वे प्रशासनाला यश अाले. त्यामुळे अागीचे प्रमाण वाढले नाही. अागग्रस्त काेच गाडीपासून वेगळा करून सुमारे तासभराच्या विलंबाने गीताजंली एक्सप्रेसला मार्गस्थ करण्यात अाले.

  दरम्यान, अागीची माहिती कळल्याने जळगाव स्थानकावर रेल्वेच्या सर्व यंत्रणा अर्लट करण्यात अाल्या अाल्या हाेत्या. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेमुळे मागून येणाऱ्या गाेवा एक्सप्रेसला पाचाेरा रेल्वे स्थानकावर थांबविण्यात अाले हाेते.

  मुंबईहून नागपूरकडे जाणारी गीताजंली एक्सप्रेसने (क्रं १२८५९ डाऊन) म्हसावद रेल्वेस्थानक पास केल्यानंतर गाडीच्या सर्वात शेवटी असलेल्या पाॅवर काेच बाेगी क्रमांक अार/एसएलअार नं ५ ईअार-११३८८५३ या पाॅवर काेचमध्ये सर्कीटमध्ये बिघाड हाेवुन अाग लागली. ही बाब या बाेगीत असलेल्या हरीपाल ब्रह्मा, भुसावळ यांना गाडी शिरसाेली स्थानक पास हाेत असताना लक्षात अाले. त्यांनी त्याची माहिती तत्काळ रेल्वेचालकाशी संपर्क साधून कळविली. त्यावर चालकाने व्हॅक्यूम काढून १२ वाजून ० ४ मिनीटांनी गाडी थांबविली. यावेळी संपूर्ण गाडीने स्थानक पास केले हाेते. केवळ पाॅवर काेच हा स्थानकाच्या शेवटच्या टाेकावर हाेता. यावेळी रेल्वेस्थानकावरील अग्नीशमन यंत्रणेच्या मदतीने पाॅवर काेचला लागलेली अाग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात अाले. त्यासाेबतच जळगाव येथून महापालिकेच्या अग्नीशमन दलाची यंत्रणा रवाना करण्यात अाली. दरम्यान, अागग्रस्त डबा गाडी पासून वेगळा करून गीतांजली एक्सप्रेसला पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात अाले. ही गाडी १ वाजून ०३ मिनीटांनी जळगाव स्थानकात दाखल झाली. तर जळगाव रेल्वे स्थानकांवरून १ वाजून ११ मिनीटांनी भुसावळकडे रवाना झाली.

  गार्डला वैद्यकीय सेवेबाबत विचारणा...
  अागग्रस्त पाॅवर काेच मध्ये प्रवास करणाऱ्या भुसावळ येथील गार्ड हरीपाल ब्रह्मा यांची सहाय्यक रेल्वे स्टेशन मास्तर ए.ए. देखमुख यांनी भेट घेवुन त्यांना वैद्यकीय उपचारांची अावश्यकता अाहे का याबाबत विचारणा केली. यावेळी त्यांच्या साेबत याच बाेगीचा सहाय्यकही हाेता. त्यांनी त्याची अावश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.

  जळगाव स्थानकांवर यंत्रणा सज्ज...
  गीताजंली एक्सप्रेसला अाग लागल्याची माहिती कळताच जळगाव रेल्वेस्थानकावर यंत्रणा सज्ज करण्यात अाली हाेती. या घटने काेणी जखमी झाले असल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी स्थानकावर पाेहचले हाेते. सहाय्यक स्टेशन मास्तर ए.ए. देशमुख, रेल्वे पाेलिस दलाच्या पाेलिस उप निरीक्षक जयश्री पाटील, के.बी. सिंग,हेड काॅन्स्टेबल ए.एम.महाजन, काॅन्स्टेबल चंदन सिंग, जीपीअारचे हेड काॅन्स्टेबल अनिल नगराळे, एएसअाय वाघ, रविंद्र ठाकुर, याेगेश अडकणे, समाधान कखंरे, मनाेज मेश्राम अादींचा समावेश हाेता.

  काय असते पाॅवर काेच...
  रेल्वेच्या बहुतांश गाड्या अाता वीजेवर धावतात. त्यासाठी रेल्वे ट्रॅकच्या वरून उच्च दाब क्षमतेच्या स्वतंत्र वीज वाहन्या असतात. त्याच्या सहाय्याने रेल्वेगाड्या धावतात. ९३-९४ मध्ये अलीगड येथे हायटेन्शनच्या वीज तारांवर अनेक झाडं पडल्यानंतर १४ तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली हाेती. त्यानंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पाॅवर काेच जाेडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला अाहे. अापातकालीन व्यवस्था म्हणून तसेच वीजेचा ताण कमी करण्यासाठीही पाॅवर काेचचा उपयाेग केला जाताे. या पाॅवर काेचमध्ये डिझेलने चालणारे जनरेटर असते. त्या जनरेटरवर रेल्वे गाडीतील बाेग्यामधील फॅन व एसी यंत्रणेसाठी वीज वापरली जाते. मात्र, या पाॅवर काेचमध्ये तांत्रिक बिघाड हाेवुन अाग लागण्याच्या घटना वरचे वर घडत असतात. गेल्या वर्षीच दिल्लीत पाॅवर काेचला अाग लागल्याची घटना घडली हाेती.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

 • Major Fire to Geetanjali Express Near jalgaon
 • Major Fire to Geetanjali Express Near jalgaon
 • Major Fire to Geetanjali Express Near jalgaon
 • Major Fire to Geetanjali Express Near jalgaon
 • Major Fire to Geetanjali Express Near jalgaon

Trending