आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या या वीर जवानाने फक्त 120 जवानांसोबत 1300 चीनी सैनिकांना चारली धूळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - 18 नोव्हेंबर 1962 रोजी रेजांगलाचे युद्ध झाले होते. भारतीय लष्काराचे लिटमस टेस्ट म्हणून याकडे पाहिले जाते. त्यावेळी कमीतकमी संसाधने असूनही भारतीय सैन्याने चीनच्या सैन्याशी लढा दिला होता. या युद्धात भारताने अनेक जवान आणि अधिकारी गमावले होते. यांमध्ये मेजर शैतानसिंग एक असेच नाव आहे. 1962 साली वयाच्या अवघ्या 37 वर्षी देशासाठी शहीद झाले. 

 

120 भारतीयंसमोर 1300 चीनी सैनिकांचा नाही लागला टिकाव : 1962 च्या भारत-चीन युद्धातील उल्लेखनीय नेतृत्वामुळे मेजर शैतानसिंग यांना मृत्यूपश्चात परमवीर चक्राने गौरविण्यात आले. लढाईत 13 व्या कुमाऊँ बटालियन कंपनीने रेजांग येथे शैतानसिंन यांच्या नेतृत्वाखाली चीनच्या सैनिकांना तोडीसतोड उत्तर दिले होते. 

 

पहिले 350 आणि नंतर 400 चीनी सैनिकांनी आक्रमण केले. परंतु मेजर शैतानसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने त्यांना प्रतिउत्तर दिले. युद्धात जखमी झाल्यानंतरही शैतानसिंग एका पोस्टवरून दुस-या पोस्टवर जाऊन सैनिकांना प्रोत्साहन देत होते. मेजर शैतानसिंग यांच्या चतुर आणि धैर्यवान नेतृत्वामुळे भारतीय सैन्याने या मोर्चावर 1,300 पेक्षा जास्त चीनी सैनिकांना ठार केले होते. 

बातम्या आणखी आहेत...