आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा शहीद झाल्याची बातमी फोनवर पत्नीला सांगताना मेजरची झाली अडचण, प्रेग्नंट पत्नी चक्कर येऊन पडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क - सीमेवर एखादा जवान शहीद होतो तेव्हा कुटुंबीयांना केवढ्या मोठ्या दुःखाचा सामना करावा लागतो याचा प्रत्यत नुकताच आला. ऋषिकेश येथील गुमानीवालामध्ये राहणारे रायफलमॅन हमीर सिंह पोखरियाल यांच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. हमीर सिंह जम्मू-काश्मीरच्या बांदीपुरामध्ये शहीद झाले. ही बातमी त्याच्या कुटुंबीयांनी समजली तेव्हा कुटुंबासह संपूर्ण गावत दुःखात बुडाले. 
 
फोनवर मेजर अडचणीत..
7 ऑगस्टला सकाळी 10 वाजता जम्मूहून मेजरने हमीरसिंग शहीद झाल्याची बातमी देण्यासाठी त्यांच्या घरी फोन केला. घरी शहीद हमीर यांची पत्नी पुजाने फोन घेतला. पण त्यांना ही बातमी देणे मेजरना शक्य होत नव्हते. त्यांनी विचारले की सासरे कुठे आहेत. तेव्हा पुजा यांनी ते अमरनाथ यात्रेत तैनात आहेत असे सांगितले. सासूबाबत विचारले तर त्या सत्संगला गेल्या असल्याचे सांगितले. पुजा यांनी मेजरला म्हटले की काय आहे ते मला सांगा, पण मेजर म्हणाले तुम्हाला सांगू शकत नाही. त्यावर पुजाने दिराला फोन दिला. तेव्हा मेजरने हमीरसिंह शहीद झाल्याचे सांगितले. 
 
बातमी ऐकताच बेशुद्ध झाली पत्नी 
पत्नी शहीद झाल्याचे ऐकताच त्यांची प्रेग्नंट पत्नी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. काहीवेळाने ती शुद्धीत आली पण रडून रडून तिची अवस्था वाईट झाली होती. शहीद हमीरसिंह यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. घरात नेमके काय घडत आहे, याचा अंदाजही तिला येत नाही. हमीर यांचे दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांशी फोनवर बोलणे झाले होते, असे कुटुंबीय म्हणाले.
 
2010 साली झाले होते सैन्यात भरती 
शहीद यांचे भाऊ सुनील यांनी सांगितले की हमीर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात घरी आले होते. ते 2010 मध्ये 12 गढवाल रायफलमध्ये भरती झाले होते. हमीर यांचे वडील एसएसबीमध्ये सब इन्सपेक्टर आहेत. त्यांच्याशिवाय काका शैलेंद्र सिंह गढवाल रायफल आसाममध्ये तैनात आहेत. तर दुसरे काकाही जम्मूत तैनात आहेत.

बातम्या आणखी आहेत...