आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन् पासपोर्ट मिळाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
60 जून 1995 ची गोष्ट. भारत-कॅनडा युवक आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत 1 जुलै 1995 ला आम्ही जॉर्डेनियन एअरलाइन्सने कॅनडाला प्रस्थान करणार होतो. यूथ एक्स्चेंज, सेल, एन. सी. सी. चे डायेक्टर कमांडर भास्करन यांनी आम्हा सर्वांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले. कॅनेडियन दूतावासात व्हिसा मिळण्यासाठी जमा करावयाचे होते. माझ्याजवळ पासपोर्ट नव्हता. पासपोर्ट म्हणजे काय? तो कुठे मिळतो, कसा मिळतो, याची मला काहीही कल्पना नव्हती. कारण पारनेरसारख्या ग्रामीण भागात मी कार्यरत होतो. मार्च 1995 मध्ये निवड झाल्यानंतर प्रत्येकाने आपला पासपोर्ट बनवून घ्यावा, असा आदेश आम्हाला दिला होता. निवड झाल्याचे पत्रही आम्हाला दिले होते. परंतु माझ्या अज्ञानामुळे मला तो मिळू शकत नाही.
दिल्लीमध्ये गेल्यावर काय व्हायचे, ते बघू अशी माझी धारणा! माझ्याकडे पासपोर्ट नाही हे ऐकून कमांडर भास्करन्ला अत्यानंद झाला. त्यांचा वेगळाच डाव होता. त्यांच्या केरळमधील अरुल मोझी या एनसीसी अधिका-याला या कार्यक्रमासाठी पाठवायचे होते. परंतु दुर्दैवाने त्यांची निवड झाली नव्हती. संध्याकाळी माझा दु:खी व रडवेला चेहरा पाहून ब्रिटिश कोलंबिया - महाराष्टÑ टीमचे कोऑर्डिनेटर कर्नल चक्रवर्ती मला म्हणाले, ‘तुकाराम क्या बात है, बहुत दुखी लग रहे हो। कॅनडा ना जाने की खुशी तो नही हो रही क्या?’ मी म्हणालो, सर, मेरा पासपोर्ट तैयार नही है। कमांडर भास्करने मुझे साफ कहा है की मै कॅनडा नही जा सकता।’’ कर्नल साहेब म्हणाले, तुम्हारे पास दो पासपार्ट साइज के फोटो है क्या? मी हो म्हटल्यावर म्हणाले, ‘‘मेरे पास दे दो। और यहांपर साइन करो। एका फॉर्मवर माझ्या सह्या घेतल्या. फोटो घेतले. दुस-या दिवशी 21 जूनला सायंकाळी मला म्हणाले, ये ले तेरा पासपोर्ट! अब थोड हंसके दिखा। मला आश्चर्याचा धक्का बसला. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. डोळ्यातून अक्षरश: अश्रू ओघळले.त्यांच्यामुळे मला परदेशात जाण्याची संधी मिळाली.