आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : हिट कॉमेडी चित्रपट 'चुपके-चुपके' 1975 मध्ये आला होता. आता या चित्रपटाचा रिमेक बनणार आहे. फिल्ममेकर भूषण कुमारने ओरिजनल टायटलचे राइट्सदेखील आपल्या नावे केले आहेत. विशेष गोष्ट ही आहे की, या रिमेकमध्ये चित्रपटात धर्मेंद्र यांनी साकारलेला रोल आता राजकुमार राव साकारणार आहे.
'चुपके-चुपके' मध्ये धर्मेंद्र यांचे डॉ परिमल त्रिपाठी हे पात्र साकारत असलेला राजकुमार राव म्हणाला की, ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. अभिनेत्याने चित्रपटातबद्दल बोलताना सांगितले, सध्या स्क्रिप्टवर काम केले जात आहे. विशेष गोष्ट ही आहे की, चित्रपटाचे ओरिजनल टायटल राइट आधीच मनीष गोस्वामीने घेतले होते, परंतु भूषण कुमार ते मिळवण्यात यशस्वी झसले आहेत. मात्र मनीष टायटल देण्याबद्दल म्हणाला की, आम्ही इंडस्ट्रीतील मित्र आहोत आणि गरजेच्या वेळी एकमेकांच्या कमी येऊ.
अशातच राजकुमार रावचा चित्रपट 'मेड इन चायना' रिलीज झाला होता. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल करू शकला नाही आणि प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला. सध्या अभिनेता हॉरर कॉमेडी चित्रपट 'रूही अफ्जा' मध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर दिसू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.