आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीला चुकूनही करू नका ही 1 चूक, यामुळे सुरु होऊ शकतो वाईट काळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी मंगळावर, 15 जानेवारीला मकरसंक्रांती आहे. हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह सांगण्यात आले असून सूर्यदेव ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य ग्रह धनु राशीतून मकर राशीत आल्यानंतर मकर संक्रांती साजरी केली जाते. 15 जानेवारीनंतर सूर्य दक्षिणायनातून उत्तरायण होतो.


उशिरापर्यंत झोपण्याची चूक करू नका 
संक्रांतीला सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे. या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये. ही चूक करणाऱ्या लोकांना सूर्यदेवामुळे अडचणींना सामोरे जावे लागू शकते. सूर्य पूजेसाठी सकाळची वेळ श्रेष्ठ राहते. यामुळे या दिवशी लवकर उठावे.


सुरु होतील मंगलकार्य
शास्त्रानुसार उत्तरायण देवतांचा दिवस आणि दक्षिणायन देवतांची रात्र असते. यामुळे मकरसंक्रांतीपासून देवतांची सकाळ सुरु होते. या दिवसांपासून सव मंगलकार्य सुरु होतात.


संक्रांतीला करावे दान-पुण्य
मकरसंक्रांतीला नदीमध्ये स्नान, दान, मंत्र जप, हवन, श्राद्ध आणि पूजा-पाठ करण्याचे महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेले दान शंभर पटीने फळ प्रदान करते. या दिवशी तूप, तीळ, गरम कपडे, खिचडी दान करू शकता.

बातम्या आणखी आहेत...