आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकरसंक्रांतीला सकाळी लवकर उठून करावेत हे 5 शुभ काम, वाढू शकते सुख-समृद्धी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी मकरसंक्रांती 14 नाही तर 15 जानेवारीला साजरी केली जाईल. सूर्याने धनु राशीतून मकर राशीमद्ये प्रवेश केल्यानंतर हा सण साजरा केला जातो. 14 जानेवारीला रात्री सूर्य राशी बदलेले यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला मकरसंक्रांती साजरी केली जाईल. या संदर्भात उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार संक्रांतीला अमृतसिद्धी, सर्वार्थसिद्धी आणि रवी योग जुळून येत आहेत. हे तिन्ही योग शुभ मानले जातात. या योगामध्ये पूज-पाठ केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.


सूर्य होणार उत्तरायण 
मकरसंक्रांतीला सूर्य दक्षिणायनातून उत्तरायण होईल. सूर्य मकर राशीत आल्यामुळे पुन्हा मंगलकार्य सुरु होतील. सूर्य जेव्हा मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि मिथुन राशीमध्ये असतो तेव्हा हा ग्रह उत्तरायण होतो. सूर्य जेव्हा कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु आणि मकर राशीमध्ये असतो तेव्हा दक्षिणायन असतो.


सुख-समृद्धीसाठी मकरसंक्रांतीला करा हे उपाय 
> मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि स्नान करताना सर्व पवित्र तीर्थ आणि नद्यांचे स्मरण करावे. यामुळे घरीच तीर्थ स्नानाचे पुण्य मिळू शकते.


> स्नान केल्यानंतर तांब्याच्या कलशात लाल फुल आणि तांदूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सूर्य मंत्र ऊँ सूर्याय नम: चा 108 वेळेस जप करावा. 


> तुळशीला जल अर्पण करावे आणि प्रक्षिणा घालाव्यात.


> एखाद्या मंदिरात गूळ आणि काळे तीळ दान करावेत. देवाला तीळ-गुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. भक्तांना मंदिरात प्रसाद वाटावा. 


> एखाद्या शिव मंदिरात जावे आणि शिवलिंगावर काळे तीळ आणि जल अर्पण करावे. ऊँ सांब सदा शिवाय नम: मंत्राचा जप करावा.

बातम्या आणखी आहेत...