आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशिफळ : मकर राशीतील सूर्याचा सर्व 12 राशींवर कसा राहील प्रभाव?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी मकर संक्रांती 14 नाही तर 15 जानेवारीला साजरी केली जाईल. सूर्याने धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर हा सण साजरा केला जातो. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर राहील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 14 जानेवारीला रात्री सूर्य राशी बदलून मकर राशीत आला आहे. यानंतर 13 फेब्रुवारीला कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. येथे जाणून घ्या, मकर राशीतील सूर्याचा सर्व 12 राशींवर कसा प्रभाव राहील...


मेष - मकर राशीतील सूर्यामुळे या लोकांच्या कार्यामध्ये वृद्धी होईल. वडिलांची मदत मिळेल आणि एखादे मोठे यश प्राप्त होऊ शकते.


वृष - या राशीसाठी मकर राशीतील सूर्य भाग्य वृद्धी करणारा राहील. घर-कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूने राहील.


मिथुन - या राशीच्या लोकांसाठी खर्च, अज्ञात भय आणि चिंता राहील. कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा करू नये.


कर्क - या राशीसाठी हे राशी परिवर्तन शुभ राहील. कामामध्ये यश मिळण्यासोबतच मान-सन्मान मिळेल आणि अडचणी दूर होतील.


सिंह - सूर्यामुळे सिंह राशीच्या लोकांना शत्रूंवर विजय प्राप्त होईल. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे, आजार होण्याची शक्यता आहे.


कन्या - या राशीच्या लोकांना मुलांकडून लाभ प्राप्त होईल. मुलांमुळे एखादी मोठी बाधा दूर होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...