Home | Jeevan Mantra | Dharm | makar sankranti 2019 surya uttarayan information in marathi

भीष्म यांनीही सूर्य उत्तरायण होण्याची पाहिली होती वाट, त्यानंतर सोडला होता प्राण

रिलिजन डेस्क | Update - Jan 12, 2019, 12:02 AM IST

15 जानेवारीला सूर्याचे राशी परिवर्तन होताच सुरु होणार उत्तरायण, मानला जातो देवतांचा दिवस, धर्म ग्रंथामध्येही लिहिण्यात आ

 • makar sankranti 2019 surya uttarayan information in marathi

  मकरसंक्रांती (15 जानेवारी, मंगळवार)पासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजे दक्षिणेकडून उत्तर गोलार्धात येण्यास सुरुवात करतो. यामुळे रात्र छोटी आणि दिवस मोठा होऊ लागतो. धर्म ग्रंथामध्ये उत्तरायणला देवतांचा दिवसही मानले जाते.


  उत्तरायण म्हणजे काय
  धर्म ग्रंथानुसार सूर्य एक वर्षात (365 दिवस) क्रमानुसार 12 राशीत भ्रमण करतो. जेव्हा सूर्य एखाद्या राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांती म्हणतात. सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. सूर्य मकर राशीत जाणे खूपच शुभ मानले जाते. कारण या दिवसापासून देवतांचा दिवस सुरु होतो, ज्याला उत्तरायण म्हणतात.


  शुभ असते सूर्याचे उत्तरायण होते
  ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य 30-31 दिवसांमध्ये रास बदलतो. कर्क आणि मकर राशीत सूर्याचा प्रवेश धार्मिक दृष्टीने अत्यंत शुभ मानला गेला आहे. ही प्रवेश क्रिया सहा-सहा महिन्याच्या अंतराने होते. भारत उत्तर गोलार्धात स्थित आहे. मकरसंक्रांतीपुर्वी सूर्य दक्षिण गोलार्धात असतो म्हणजे भारतापासून दूर असतो. या काळात सूर्य दक्षिणायणात असतो.


  याच कारणामुळे या काळात रात्र मोठी आणि दिवस लहान असतो तसेच थंडी राहते. परंतु मकरसंक्रांतीपासून सूर्य उत्तर गोलार्धाकडे येण्यास सुरुवात होते. यालाच उत्तरायण म्हणतात. या काळात रात्र छोटी आणि दिवस मोठा असतो तसेच उन्हाळा सुरु होतो.


  उत्तरायणाला देवतांचा दिवस का म्हणतात हे जाणून घेण्यसाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...

 • makar sankranti 2019 surya uttarayan information in marathi

  धर्म ग्रंथांमध्ये उत्तरायण देवतांचा दिवस आणि दक्षिणायण देवतांची रात्र मानली जाते. शास्त्रानुसार उत्तरायणाला सकारात्मकतेचे प्रतिक मानले गेले आहे. यामुळे हा काळ जप, तप, दान, स्नान, श्राद्ध, तर्पण इ. धार्मिक कार्यासाठी विशेष मानला जातो. मकरसंक्रांतीला सूर्याचं राशीत झालेल्या परिवर्तनाला अंधकारातून प्रकाशाकडे अग्रेसर होणे असे मानले जाते.


  प्रकाश जास्त असल्यामुळे लोकांच्या चेतना आणी कार्यशक्तीमध्ये वृद्धी होते. या काळात संपूर्ण भारतात विविध पद्धतीने सूर्यदेवाची उपासना, आराधना, पूजा केली जाते. सृष्टीवर जीवनासाठी सर्वात जास्त आवश्यकता सूर्याची आहे.


  दिवस मोठा असण्याचा अर्थ जीवनात जास्त सक्रियता आहे. या काळात सूर्याचा प्रकासही जास्त राहतो, जो शेतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. उत्तरायणाचे महत्त्व याच गोष्टीवरून स्पष्ट होते की, आपल्या ऋषीमुनींनी हा काळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानण्यात आला आहे. उपनिषदांमध्ये या सणाला 'देव दान' सांगण्यात आले आहे.


  पुढे जाणून घ्या, सूर्य उत्तरायणात गेल्यानंतरच पितामह भीष्म यांनी केला प्राण त्याग...

 • makar sankranti 2019 surya uttarayan information in marathi

  महाभारतात अनेक ठिकाणी उत्तरायण शब्दाचा उल्लेख आढळून येतो. सूर्य उत्तरायणात असण्याचे महत्त्व याच कथेवरून स्पष होते की, बाणांच्या शय्येवर पडलेल्या पितामह भीष्म यांनी सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात जाईपर्यंत प्राण त्याग केला नाही. सूर्य उत्तरायणात गेल्यानंतर त्यांनी प्राण सोडला.


  स्वतः भगवान श्रीकृष्णाने उत्तरायणाचे महत्त्व गीतेमध्ये सांगितले आहे की, उत्तरायणाचा सहा महिन्यातील शुभ काळात जेव्हा पृथ्वी प्रकाशमय असते तेव्हा शरीराचा परित्याग केल्यास व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. असे लोक ब्रह्मलोकात जातात. याउलट सूर्य दक्षिणायणात असल्यास पृथ्वी अंधकारात असते आणि या अंधकारात शरीराचा त्याग केल्यास पुनर्जन्म घ्यावा लागतो.

Trending