आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 जानेवारीला मकरसंक्रांतीला जुळून येत आहे अमृतसिद्धीचा शुभ योग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी 2019 मध्ये येणारे संक्रांती सण यावर्षी 2 दिवस साजरा केला जाईल. यावेळी संक्रांतीचे वाहन सिंह असून उपवाहन गज म्हणजे हत्ती आहे. यामुळे वर्षभर कामाचा व्याप, गतिशीलता, राजकारणात परिवर्तन, आर्थिक स्थितीमध्ये अडचणी यासारखे प्रभाव दिसून येतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. श्याम नारायण व्यास यांच्यानुसार यावेळी मकरसंक्रांतीचे नाव ध्वंक्षी आहे.


उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. अमर डिब्बावाला यांच्यानुसार सूर्याने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. यावेळी 14 जानेवारीला संध्याकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करेल. यामुळे स्नान आणि दानाचे महत्त्व 15 जानेवारीला मानले जाईल. इतर ज्योतिष विद्वानांनुसार उदयकाळ म्हणजे सूर्योदयाच्या वेळी तिथी मान्यतानुसार पर्वकाळ 15 जानेवारीला मानला जाईल.


15 जानेवारीला जुळून येत आहे अमृत सिद्धी योग
पं. डिब्बावाला यांच्यानुसार पौष मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला सोमवारी रेवती नक्षत्रामध्ये मकर संक्रांती साजरी केली जाईल. मकर राशीमध्ये प्रवेश प्रवेश करताच सूर्य उत्तरायण होईल. 15 जानेवारीला सकाळपासूनच अमृतसिद्धी योग राहील. या योगामध्ये करण्यात आले दान-पुण्य अमृत समान राहते.


संक्रांती पर्वकाळात हे करावे 
संक्रांती पर्वकाळात चांदी किंवा तांब्याच्या कलशात पांढरे किंवा काळे तीळ भरून ब्राह्मणांना दान करा. तांदूळ, पीठ, चांदी, दूध, रवा, नारळ, गूळ, वस्त्र दान करावे. स्नानाच्या पाण्यामध्ये तीळ टाकावेत.

बातम्या आणखी आहेत...