आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

900 वर्षांपूर्वी 1 जानेवारीला साजरी केली जात होती मकर संक्रांती, प्रत्येक 72 वर्षांनी तारीख एक दिवसाने वाढते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी मकरसंक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. सूर्य 14 जानेवारीला मध्यरात्रीनंतर 2 वाजता धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करेल. यामुळे 15 जानेवारीला सूर्योदयासोबत स्नान, दान आणि पूजा-पाठ करून सण साजरा केला जाईल. परंतु मागील काही वर्षांपासून संक्राती 14 किंवा 15 जानेवारीला साजरी केली जात आहे. सूर्य चालीनुसार मकर संक्रांतीच्या तारखांमध्ये बदल होत आहे. येणाऱ्या काही वर्षांनंतर हा सण 14 नाही तर 15 किंवा 16 तारखेला साजरा केला जाईल.

  • 1902 पासून 14 जानेवारीला साजरा होत आहे हा सण

काशी विश्व हिंदू विद्यालयाचे ज्योतिषाचार्य पं गणेश मिश्रा यांच्यानुसार मकर संक्रांती सर्वात पहिले 1902 मध्ये साजरी करण्यात आली होती. त्यापूर्वी 18 व्या शतकात 12 आणि 13 जानेवारीला साजरी केली जात होती. 1964 मध्ये पहिल्यांदा मकरसंक्रांती 15 जानेवारीला साजरी करण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक तिसऱ्या वर्षी अधिकमास आल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी 14 जानेवारीला आणि चौथ्या वर्षी 15 जानेवारीला साजरी करण्यात येऊ लागली. अशाप्रकारे 2077 मध्ये 14 जानेवारीला शेवटची मकर संक्रांती साजरी केली जाईल. राजा हर्षवर्द्धन काळात हा सण 24 डिसेंबरला साजरा केला जात होता. मुघल बादशाह अकबरच्या शासन काळात मकरसंक्रांती 10 जानेवारीला साजरी केली जात होती. 

  • असे का

पं मिश्रा यांच्यानुसार, सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे म्हणजे मकर संक्रांती म्हटले जाते. सामान्यतः प्रत्येक वर्षी सूर्याचा धनु राशीतून मकर राशीमध्ये 20 मिनिट उशिराने प्रवेश होतो. अशाप्रकारे प्रत्येक तीन वर्षांनी सूर्य एक तासाने आणि प्रत्येक 72 वर्षात एक दिवस उशिराने मकर राशीमध्ये प्रवेश करतो. यानुसार सन् 2077 नंतर 15 जानेवारीलाच मकर संक्रांती साजरी केली जाईल.

  • ज्योतिष आकलनानुसार सूर्याची गती प्रत्येक वर्षाला 20 सेकंदाने वाढत आहे. मान्यतेनुसार आजपासून 1000 वर्षांपूर्वी मकर संक्रांती 1 जानेवारीला साजरी केली जात होती. मागील एक हजार वर्षांमध्ये याचे दोन आठवडे पुढे गेल्यामुळे 14 जानेवारीला साजरी करण्यात येऊ लागली. ज्योतिषनुसार सूर्याच्या चालीनुसार असा अंदाज लावण्यात येत आहे की, 5000 वर्षांनंतर मकर संक्रांती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी साजरी केली जाईल.

  • कोणत्या काळात केव्हा साजरी करण्यात आली मकरसंक्रांती

1000 वर्षांपूर्वी - 1 जानेवारीला 500 वर्षांपूर्वी - 10 आणि 11 जानेवारीला  250 वर्षांपूर्वी - 11 आणि 12 जानेवारीला  सन् 1900 ते 2077 - 14 आणि 15 जानेवारीला

बातम्या आणखी आहेत...