आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकर संक्रांतीला सूर्यदेवाला अर्घ्य देऊन म्हणावी सूर्य मंत्र स्तुती, पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 15 जानेवारीला मकरसंक्रांती आहे. हा सूर्य पूजेचा उत्सव आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. स्नान केल्यानंतर गरजू व्यक्तींना सूर्याशी संबंधित पदार्थांचे दान करावे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य, पं. मनीष शर्मा यांच्यानुसार कुंडलीत सूर्याच्या शुभ-अशुभ स्थितीचा चांगला किंवा वाईट प्रभाव आपल्या बुद्धी आणि मान-सन्मानावर पडतो. सूर्याच्या शुभ स्थितीमुळे समाजात मान-सन्मान मिळतो. सूर्य पूजेने आरोग्य लाभही होतात. येथे जाणून घ्या, मकर संक्रांतीला सूर्य पूजा करताना कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.... स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दयावे. यासाठी तांब्याच्या कलशाचा वापर करावा. कलशात पाणी, अक्षता, लाल फुल टाकून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्घ्य दिल्यानंतर सूर्य मंत्र स्तुतीचा पाठ करावा. यासोबतच सूर्यदेवाकडे शक्ती, बुद्धी, आरोग्य आणि सन्मानाची इच्छा व्यक्ती करावी.

  • सूर्य मंत्र स्तुति

नमामि देवदेवशं भूतभावनमव्ययम्। दिवाकरं रविं भानुं मार्तण्डं भास्करं भगम्।। इन्द्रं विष्णुं हरिं हंसमर्कं लोकगुरुं विभुम्। त्रिनेत्रं त्र्यक्षरं त्र्यङ्गं त्रिमूर्तिं त्रिगतिं शुभम्।।

  • अशाप्रकारे सूर्य उपासना केल्यानंतर धूप-दीप लावून सूर्यदेवाची पूजा करावी.

  • सूर्यदेवाशी संबंधित वस्तू उदा. तांब्याचे भांडे, पिवळे किंवा लाल वस्त्र, गहू, गूळ, माणिक, लाल चंदनाचे दान करावे. आपल्या इच्छेनुसार यापैकी कोणत्याही वास्तूचे दान केले जाऊ शकते. सूर्यदेवाचे व्रत करावे. दिवसातून एकदा फलाहार करून सूर्यदेवाचे पूजन करावे.

  • यामुळे या सणाला म्हटले जाते मकर संक्रांती

पं. शर्मा यांच्यानुसार सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा याला मकरसंक्रांती म्हणतात. सूर्यदेवाची राशी परिवर्तनाला मकर संक्रांती म्हणतात. मकर संक्रांतीनंतर सूर्यदेवाची स्थिती बदलते. सूर्य दक्षिणायनातून उत्तरायण होतो. महाभारतामध्ये पितामह बिष्म यांनी उत्तरायणात प्राण त्याग केला होता. या दिवसापासून देवतांचा दिवस सुरु होतो. यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक मानण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...