Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | makarsankranti 2019 surya mantra according rashi in marathi

वर्षभर सुख-समृद्धी प्राप्त करण्यासाठी मकरसंक्रांतीला राशीनुसार करा या सूर्य मंत्राचा जप

रिलिजन डेस्क | Update - Jan 14, 2019, 12:02 AM IST

मकरसंक्रांतीला सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. सूर्यदेवाची प्रसन्नता वर्षभर सुख-समृद्धीची कृपा करणारी आहे. मकरसंक्रांत

 • makarsankranti 2019 surya mantra according rashi in marathi

  मकरसंक्रातीला सूर्य शनीच्या घरात मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीत प्रवेश करतच उत्तरायण सुरु होते. या दिवसापासून (15 जानेवारी) देवतांचा दिवस सुरु होतो. सुर्यदेवामध्ये सर्व देवतांचा वास मानण्यात आला आहे. याच कारणामुळे मकरसंक्रांतीला सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. सूर्यदेवाची प्रसन्नता वर्षभर सुख-समृद्धीची कृपा करणारी आहे. मकरसंक्रांतीला राशीनुसार सूर्य मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य दिल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते....


  मेष -
  सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी आणि तीळ घेऊन त्यामध्ये थोडासा गुळ आणि लाल कन्हेरीचे फुल टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ नित्यानन्दाय नमः।


  वृषभ -
  सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी आणि तीळ घेऊन त्यामध्ये पांढरे चंदन मिसळून पांढरे फुल टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ जगत नन्दाय नमः।


  मिथुन
  अर्घ्य देण्यासाठी एका तांब्यामध्ये पाणी आणि तीळ घेऊन त्यामध्ये अष्टगंध मिसळून दुर्वा टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ जस्कराय नमः।


  कर्क -
  सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी आणि तीळ घेऊन त्यामध्ये दुध मिसळून पांढरे फुल टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ आत्मरूपिणे नमः।


  सिंह -
  सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी आणि तीळ घेऊन त्यामध्ये कुंकू मिसळून रूटीचे फुल टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ सर्वाय नमः।


  कन्या -
  कलशामध्ये पाणी, तीळ, चंदन आणि दुर्वा घेऊन खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने सूर्यदेवाची आरती करा.
  मंत्र - ऊँ दीप्तमूर्तये नमः।


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीचे सूर्य मंत्र...

 • makarsankranti 2019 surya mantra according rashi in marathi

  तूळ -
  सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कलशामध्ये तीळ, पाणी, चंदन घ्या. त्यामध्ये पाढरे फुल टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ श्रीमंते नमः।

   

  वृश्चिक -
  सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या कलशात पाणी आणि तीळ घेऊन त्यामध्ये लाल कन्हेरीचे फुल टाका. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र  - ऊँ  ब्रह्मणे नमः।

 • makarsankranti 2019 surya mantra according rashi in marathi

  धनु
  सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कलशामध्ये तीळ आणि केशराचे पाणी घ्या. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ वीराय नमः।


  मकर -
  मकरसंक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. या राशीच्या लोकांनी काळे तीळ आणि पाणी कलशात घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. तिळाच्या तेलाने सूर्यदेवाची आरती करा.
  मंत्र  - ऊँ जयाय नमः।

 • makarsankranti 2019 surya mantra according rashi in marathi

  कुंभ -
  कुंभ रास शनीचे दुसरे घर आहे. या राशीच्या लोकांनीसुद्धा काळे तीळ आणि पाणी कलशात घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. तिळाच्या तेलाने सूर्यदेवाची आरती करा.
  मंत्र - ऊँ सत्यानन्द-सर्वस्वरूपिणे नमः।


  मीन -
  सूर्याला अर्घ्य देण्यासाठी कलशामध्ये तीळ आणि केशराचे पाणी घ्या. त्यानंतर खालील मंत्राचा उच्चार करून सूर्याला अर्घ्य द्या. तिळाच्या तेलाने आरती करा.
  मंत्र - ऊँ भगवते नमः।

Trending