इन्स्टाग्रामवर ब्रँडिंग करून स्वत:चे करिअर करा यशस्वी

दिव्य मराठी वेब टीम

Mar 18,2019 11:04:00 AM IST

गॅझेट डेस्क । इन्स्टाग्रामचा वापर सर्वसामान्यपणे एक फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप म्हणून केला जाताे; परंतु या प्लॅटफॉर्मचा उपयाेग स्वत:च्या व्यावसायिक महत्त्वाकांक्षा शेअर करण्यासाठीही करू शकता. स्वत:च्या करिअरची कथा सांगणेे, नेटवर्क तयार करणे व एक कर्मचारी म्हणून स्वत:चा ब्रँड बनवून त्याच्या प्रमोशनसाठी याचा वापर केला जाऊ शकताे.


तुमच्यासाठीही ठरू शकेल फायदेशीर
सध्याच्या काळात कंपन्या संभावित जॉब कंॅडिडेट्सना आकर्षित करण्यासह त्यांची माहिती मिळवण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा माेठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. विशेषत: त्यांचे अकाउंट्स फॉलो करणाऱ्यांना. एका अभ्यासानुसार प्रत्येक चारपैकी एक निवडकर्ता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर करताे. लिंक्डइन केवळ व्यावसायिक बाजू समाेर ठेवते; परंतु इन्स्टाग्रामच्या माध्यमातून निवडकर्त्यांना तुमचे व्यक्तिमत्त्व, आवड, जीवन, काम आदीची माहिती मिळत असते.


कंपन्यांशी जुळण्यासाठी हॅशटॅगचा वापर करा
स्वत:ची पोस्ट फ्लॅग किंवा कॅटेगराइज करणे व इन्स्टाग्रामवर त्यास सर्चेबल बनवण्यासाठी याेग्य हॅशटॅगचा वापर करा. म्हणजे, एखाद्या कार्यक्रमास गेला असाल तर त्याची ऑफिशियल हॅशटॅग वापरा. आपल्या अकाउंट्सवर निगराणी ठेवणाऱ्या कंपन्यांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी टॅगिंग हा चांगला फंडा आहे. कंपनीच्या लीडर्सना काेणत्याही कार्यक्रमाबाबत, मी तुमची उत्पादने वापरताे, असे सांगायचे असल्यास किंवा 'धन्यवाद' व्यक्त करण्यासाठी 'टॅगिंग' चा वापर करा.


इन्स्टाग्राम बायोद्वारे ब्रँडला करा मजबूत
इन्स्टाग्राम बायोग्राफीत स्वत:ची व्यावसायिक व वैयक्तिक आेळख सांगण्यासाठी केवळ १५० अक्षरे मिळतात. लिंक्डइनवर एक ब्रंॅडेड व कीवर्ड‌्सने परिपूर्ण हेडलाइन बनवली असेल तर तुम्ही तुमच्या बायोसाठी त्याच्याच एका व्हर्जनचा वापर करू शकता; परंतु असे करताना शब्दसंख्या कमी करणे व व्हिज्युअल अपीलसाठी इमोजी वापरणे विसरू नका. यासाठी स्वत:च्या बायोग्राफीत लिंक्डइन प्रोफाइल किंवा डिजिटल पोर्टफोलियो साइटचा रेफरन्सदेखील तुम्ही देऊ शकता.

X
COMMENT