आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई / नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते संघप्रिय गौतम यांना भाजपला घरचा आहेर देताना पक्षात बदल करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उप-पंतप्रधान करण्यात यावे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या जागी राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची धुरा द्यावी. यासोबतच, अमित शहा यांना राज्यसभेत नेतृत्वाची जबाबदारी सोपवून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मध्य प्रदेशचे माजी सीएम शिवराज सिंह चौहान यांना देण्यात यावी. असे बदल केल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास वाढेल असेही संघप्रिय म्हणाले आहेत.
ज्येष्ठ नेते गौतम संघप्रिय यांनी यासंदर्भात एक पत्र सुद्धा जारी केले आहे. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपले पद सोडून धार्मिक कार्यांमध्ये अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिली. संघप्रिय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, पीएम मोदींनी देशाचे नावलौकिक केले यात शंका नाही. ते देशातील सर्वात लोकप्रिय आणि आवडते नेते आहेत. परंतु, देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही. भारताची सद्यस्थिती पाहता, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट चालेल याची शक्यता कमीच आहे असे भाकित त्यांनी वर्तवले आहे.
केवळ देशातील जनताच नव्हे, तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आपला विजय निश्चित करायचा असेल तर त्यांना हे बदल करावेच लागतील. संघप्रिय यांनी सरकारच्या नियोजन आयोगाला नीति आयोग करणे, सुप्रीम कोर्ट, आरबीआय, सीबीआय इत्यादी घटनात्मक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप, मणिपूर आणि गोव्यात फोडा-फोडीचे राजकारण या सर्वच मुद्द्यांवर घरचा आहेर दिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.