आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांना पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष करा, हीच याेग्य वेळ; काँग्रेसमध्ये पुन्हा मागणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला राष्ट्रीय नेतृत्वाच्या अभावी संकटात असल्याची जाणीव होत आहे. त्यामुळेच पक्षाचे वरिष्ठ नेते अजय माकन यांनी राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे धुरा दिल्यास अनिश्चितता संपुष्टात येईल. राहुल हेच पक्षातील सर्वांची पसंती आहेत. आता जुन्या पिढीने तरुण नेत्यांसाठी हळूहळू मार्ग प्रशस्त केला पाहिजे. पक्ष काळानुसार बदलला नाही तर लोक पक्ष बदलून टाकतात. राहुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेऊ शकतात. ते सामान्य नागरिकांचे मुद्दे कौशल्याने मांडतात. देशाला अशा नेत्याची गरज आहे. चांगली भाषणे देणाऱ्यापेक्षा चांगला उद्देश असलेल्या नेत्याची आवश्यकता आहे, असे माकन यांनी सांगितले.सोनिया गांधी दीर्घकालीन सल्लागार हव्या


पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी सल्लागार म्हणून हव्या आहेत. कारण त्यांचा अनुभव व काँग्रेसविषयक प्रकरणात लक्ष घालण्याची तज्ञता नूतन अध्यक्षांसाठी गरजेची ठरेल. त्यासाठी पक्षाच्या घटनेत बदल करता येऊ शकेल. केवळ अध्यक्ष व कार्य समितीच्या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही. काँग्रेसने सामाजिक, आर्थिक मुद्दे व राष्ट्रवादावर स्पष्टपणे भूमिका मांडली पाहिजे. पक्षातील नेत्यांनी मुख्य मुद्द्यावर वेगवेगळी मते मांडू नये.मोदी, शहा राहुल यांना घाबरतात : सुरजेवाला यांनी केला दावा 

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहादेखील राहुल गांधी यांच्या दृढ संकल्पाला घाबरतात. राहुल यांनी भाजप व संघाचा मुकाबला केला आहे. त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. आता आपण प्रांतीय नेतृत्वाच्या मुद्द्यांना सोडून दिले पाहिजे. काँग्रेसचे पुनरुत्थान केले पाहिजे. राहुल गांधी हेच पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी एकमेव पर्याय ठरतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...