आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल ड्राय फ्रुट्स मोदक, वाचा रेसिपी...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 2 सप्टेंबर रोजी प्रत्येक घरात बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पांच्या स्वागताचा उत्साह घराघरात दिसुन येत आहे. तुम्ही देखील आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागताची तयारी करत आहात ना... मग बाप्पांना खुश करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत ड्रायफ्रूट आणि पोहा मोदक रेसिपी... एकदम स्वादिष्ट आणि बाप्पांना आवडणारे मोदक बनवा. आपला आनंद व्दिगुणीत करा. चला तर मग उशीर कसला करताय... बाप्पांचे आगमन होण्याअगोदर बनवा ड्राय फ्रुट मोदक...


ड्राय फ्रुट्स मोदक
हे मिश्रण शेंगदाणे, खजूर, मनुका आणि कोरडे खोबरे यांनी बनविलेले आ
हे.
१) प्रथम ग्राईंडर किंवा फूड प्रोसेसरमध्ये बदाम आणि काजू घ्या. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ते भाजून देखीलसुकवू शकता, परंतु तसे करणे हे अनिवार्य नाही.
२) मिश्रणातून पूड काढा.
३) आता खजूर आणि मनुका घाला.
४) तसेच कोरडे खोबऱ्याचे किस घाला.      
५) पुन्हा मिक्स करा आणि खरखरीत मिश्रण बनवा.    
६) आता तूप घाला.
७) पुन्हा मिक्स करायला सुरूवात करा, पीठाप्रमाणे ते एकत्र येईल. जर ते एकत्र येत नसेल तर आपण त्यात १ चमच पाणी घालून ढवळू शकता.
८) ते मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या. मोदकांच्या साच्याला तूप लावा. साचा वापरून त्यांना आकार देण्यास सुरुवात करा. सामान्यत: साचा जवळच ठेवा, मिश्रण भरून तळाशी असलेल्या छिद्रातून घट्ट दाबणे सुरू करा. मग खालच्या पृष्ठभाग गुळगुळीत करा, त्यानंतर काळजीपूर्वक साचा उघडा आणि ड्राय फुट्स मोदक बाहेर काढा. बाकीच्या मोडकांसाठी तशीच पुनरावृत्ती करा.  

पुढील स्लाईडवर वाचा, पोहा मोदक रेसिपी...

बातम्या आणखी आहेत...