Home | National | Other State | Make Your Own Inverter At Home In Just 500 Rupees

घरबसल्या फक्त 5 मिनिटांत बनवा हा 500 वॉटचा इन्व्हर्टर, 10 तास चालेल LED बल्ब

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 08, 2018, 12:11 AM IST

फक्त 5 मिनिटांत घरबसल्या बनवा हे 500 वॉटचे इन्व्हर्टर

 • Make Your Own Inverter At Home In Just 500 Rupees

  नॉलेज डेस्क - महाराष्ट्रात शहरात तसेच खेडोपाडी भारनियमनाची समस्या नेहमीचीच झाली आहे. यामुळे जर तुमच्या घरीही विजेची अडचण असेल, तर तुम्ही हा 500 वॉटचा इन्व्हर्टर बनवू शकता. यामुळे कमीत कमी प्रकाशाची तरी समस्या दूर होण्यास मदत होईल. या इन्व्हर्टरमधून तुम्ही 10 तासांपर्यंत LED बल्ब चालवू शकता. आणि यासाठी एखाद्या टेक्निशियनकडे जाण्याची बिलकूल गरज नाही, तुम्ही स्वत: घरबसल्या हे बनवू शकता. या प्रकारच्या इन्व्हर्टरसाठी अंदाजे 500 रुपये खर्च येतो.

  # या साहित्याची असते गरज
  1. फॅन कॅपिसिटर 4.00uF
  2. फॅन कॅपिसिटर 3.15uF
  3. 100-120 MFD रन कॅपिसिटर

  या तिन्ही वस्तू तुम्ही कोणत्याही इलेक्ट्रॉनिक शॉपमधून खरेदी करू शकता. फॅन कॅपिसिटरची किंमत 30 रुपये असते. म्हणजेच 120 रुपयांत चारही कॅपिसिटर येतील. दुसरीकडे, रन कॅपिसिटर हा 300 ते 350 रुपयांत खरेदी करू शकता. हे सर्व कॅपिसिटर 440 व्होल्टला सपोर्ट करतात.


  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हा इन्व्हर्टर तयार करण्याची प्रोसेस...

 • Make Your Own Inverter At Home In Just 500 Rupees

  सर्वात आधी चारही कॅपिसिटरना आपसात कनेक्ट करावे लागेल. यासाठी एक 4.00uF फॅन कॅपिसिटरचे वायर दुसऱ्याशी जोडा. जसे बाजूच्या फोटोत दिसत आहे. ठीक याचप्रमाणे, 3.15uF कॅपिसिटरलाही एकमेकांशी कनेक्ट करा. आता हे दोन्ही आपसात जोडा. जसे बाजूच्या फोटोत दिसत आहे. काळजी नको, वायर कसेही जोडा. त्यात प्लस - मायनसची भीती नसते.

 • Make Your Own Inverter At Home In Just 500 Rupees

  आता तयार झालेले चार कॅपिसिटरच्या ग्रुपला 100-120 MFD रन कॅपिसिटरशी कनेक्ट करावे लागेल. यासाठी त्यांचे वायर आपसात कनेक्ट करा. येथेही प्लस - मायनसची भीती नसते. आता एक होल्डरमध्ये वायर लावून या कॅपिसिटरशी कनेक्ट करा. जसे फोटोत दिसत आहे तसे.

 • Make Your Own Inverter At Home In Just 500 Rupees

  आता तुमचे इन्व्हर्टर तयार झालेले आहे, परंतु यात पॉवर नाही. यासाठी तुम्हाला तुमचे विजेच्या स्विचपासून एक वायर लावून दोन्ही पॉइंटला टच करून लगेच हटवायचे आहे. ही प्रोसेस 5 ते 6 वेळा करायची आहे. यामुळे कॅपिसिटरमध्ये पॉवर येईल. आता होल्डरमध्ये LED बल्ब लावू शकता. जर बल्ब 7 वॉटचा असेल तर हे इन्व्हर्टर 8 ते 10 तासांचे बॅकअप देईल.

Trending