आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' च्या टायटलच्या वादावर मेकर्सने मौन सोडले आहे. चित्रोपाताच्या नावाबद्दल अनेक मराठी जाणकारांचा तर्क आहे की, त्यांचे नाव तानाजी आहे, पण मेकर्स 'तान्हाजी' यूज करत आहेत, ते चुकीचे आहेत. यावर दिग्दर्शक ओम राऊतने मौन सोडले आहे, ओमचे म्हणणे आहे की, 'इतिहासातील पाने उलटली गेली तर त्यातही त्यांचे नाव 'तान्हाजी' हेच आहे.'
फॅमिलीनेही केले अप्रूव्ह...
ओमने सांगितल्यानुसार, तान्हाजी यांच्या फॅमिलीनेही सूचित केले की, त्यांचे नाव 'तान्हाजी' हेच यूज केले जावे. चित्रपट पुण्याबाहेर बनलेल्या सिंहगड किल्ल्याच्या विजयावर आधारित आहे. जेथे त्यांची समाधीदेखील आहे. तेथे त्यांची जी मूर्ति आहे, त्याखालीही त्यांचे नाव तानाजी नाही तर पूर्ण नाव 'नरवीर सुभेदार तान्हाजीराव मालुसरे' लिहिले गेले आहे.
इतिहासासोबत केली गेली नाही कोणतीही छेडछाड...
दिग्दर्शक ओमम्हणाला, "आम्ही इतिहासासोबत कोणतीही छेडछाड केली नाही. केवळ गैरसमजामुळे असे होत आहे कारण 'तान्हाजी' 1670 मधील योध्ये होते. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या इतिहासकारांनी याबद्दल वेगवेगळे लिहिलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचे नाव आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. पण आम्ही तेच नाव लिहिले जे त्यांच्या कुटुंबीयांकडून आले."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.