आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : 31 जानेवारी 2020 ला रिलीज होणार असलेला राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यांचा चित्रपट 'तुर्रम खान' चे टायटल बदलले आहे. मेकर्सने चित्रपटाचे नाव 'छलांग' करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेल्या नुसरतने आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून याची माहिती दिली आहे. विशेष गोष्ट हि आहे की, चित्रपटाचा निर्माता अजय देवगण आहे, तर याचे दिग्दर्शन हंसल मेहताने केले आहे. चित्रपटात दोन्ही मुख्य कलाकारांसोबतच मोहम्मद जीशान अय्यूबदेखील महत्वाच्या भूमिकेत आहे.
राजकुमार राव आणि नुसरत भरूचा यापूर्वी 2010 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'लव्ह सेक्स और धोखा' मध्ये एकत्र दिसले होते. चित्रपट 'तुर्रम खां' हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केला आहे. ज्यांनी यापूर्वी राजकुमारसोबत 'सिटीलाइट्स', 'शाहिद' आणि 'ओमेर्टा' मध्ये काम केले होते.
चित्रपटाच्या रिलीजसाठी दोन्ही कलाकार खूप उत्साहित आहेत. अभिनेत्री नुसरतनुसार तिने आतापर्यंत असा कोणताही रोल केलेला नाही. सांगितले जात आहे की, हा चित्रपट यूपीच्या छोट्याशा शहराची कहाणी आहे. मेकर्सनुसार, चित्रपटात सामाजिक मुद्दे दाखवले जाणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.