आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 बॉलिवूडच्या निर्मात्यांची दक्षिणेच्या मार्केटवर नजर, प्रभासच्या कॅमियोमुळे दक्षिणेत हिट होईल 'सूर्यवंशी' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्ण. मुंबई : अक्षय कुमार सध्या हैदराबादमध्ये 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या क्लायमेक्सचे शूटिंग करत आहे. या विशेष दृश्यासाठी रणवीर सिंह आधीच हैदराबादला रवाना झाला आहे. अजय देवगणदेखील लवकरच तेथे जाणार आहे. सूत्रानुसार यात अभिनेता प्रभासदेेखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात विशेष भागात सहभागी होण्याबरोबरच तो चित्रपटाला दक्षिणेच्या मार्केटमध्ये प्रमोट करणारा चेहरादेखील ठरू शकतो. 


दक्षिणेचे मार्केट टॅप करण्याच्या हेतुनेच त्याला निर्मात्यानेे घेतल्याचा अंदाज आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'वॉर'च्या कलेक्शनमुळे निर्मात्यांना तेथील मार्केटमध्ये जाण्यास भाग पाडले आहे. विशेष करून आंध्रप्रदेशातील मार्केटमध्ये, कारण तेथे सिंगल स्क्रीन्सची संख्या एका हजारापेक्षा जास्त आहे. डब व्हर्जनमध्ये हिंदीचे चित्रपट हळू-हळू आपले पाय पसरू लागले आहेत. सलमान खानदेखील 'दबंग 33 तेथे रिलीज करण्याच्या विचारात आहे. 

  • धूसर होत चालली भाषाई रेखा

शाहिद कपूरच्या करिअरमधला सर्वात हिट ठरलेला 'कबीर सिंह'चे दिग्दर्शन दक्षिणेतील संदीप रेड्डी वांगा यांनी केले. अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चे दिग्दर्शन राघव लॉरेंस करत आहेत. याचप्रमाणे किच्‍चा सुदीप 'दबंग 3' मुख्य खलनायक साकारत आहे. अमिताभ बच्चन यांनी 'सई रा नरसिं‍हा रेड्डी' मध्ये पाहुण्या कलाकारांची भूमिका केली आहे. 

  • ट्रेड तज्ज्ञांच्या मते...

सध्या दक्षिणेतील हिंदी रिमेकला तेथील दिग्दर्शकांकडून दिग्दर्शन करून घेतले जात आहे. तर, तेथील कलाकारांनाही येथील चित्रपटात घेतले जात आहे, हा काही योगायोग नाही. शिवाय बॉलीवूडचे कलाकार तेथे काम करायला जात आहेत. 

  • 2345 ते 2680 सिंगल स्क्रीन्स दक्षिणेत

नुकतेच सलमान खानने चिरंजीवीसोबत एक जाहिरातदेखील केली आहे. त्यात चिरंजीवीचा मुलगा रामचरणने सलमानला आवाज दिला आहे. दक्षिणेतील सिंगल स्क्रिन्सची संख्या पाहून सलमान तेथे चित्रपट िरलीज करण्याची योजना आखत आहे. आकड्यावर नजर टाकली तर पूर्ण भारतात 2400 मल्टिप्लेेक्स स्क्रीन आहे. सिंगल स्क्रीन्सची संख्या 6700 आहे. त्यापैकी 2345 ते 2680 सिंगल स्क्रिन्स दक्षिणेत आहेत. त्यामुळे कमाईच्या हिशेबाने बॉलिवूडच्या निर्मात्यांसाठी दक्षिण भारत खूपच खास झाले आहे. 

हिंदीत हिट झालेले दक्षिणेतील रिमेक 

तेलुगु  हिंदी रीमेकटोटल कमाई 
अर्जुन रेड्डीकबीर सिंह278.24 कोटी रुपये 
टेंपरसिम्बा240.31 कोटी रुपये 
कशानमबागी 2164.38 कोटी रुपये 
किककिक231.85 कोटी 
विक्रमाकुडूराउडी राठौर133.25 कोटी 

  ​​​​​​​ ​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...