आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : 'बोल उठा ये जग सारा, जय मर्द मराठा रे...' हे गाणे आशुतोश गोवारीकरच्या 'पानिपत' चित्रपटातील आहे. या गाण्याचा मेकिंग व्हिडिओ रिलीज अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. युद्धावर आधारित या चित्रपटातील हे गाणे मोठ्या प्रमाणात चित्रीत करण्यात आले आहे. आशुतोषच्या आधीच्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपटदेखील भव्य असणार आहे. यात राजेशाही थाटाचा भव्य डौलारा दाखवण्यात येणार आहे. जाणून घेऊया या गाण्याविषयी....
मराठा साम्राज्याची भव्यता दिसते...
या गाण्यात मराठा साम्राज्याची भव्यता दिसते. त्या काळातील पारंपरिक उत्सव कशा प्रकारे साजरा केला जात होता, तो यात टिपण्यात आला आहे. कोरिओग्राफर राजू खान यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. त्या काळातील लोक कसे राहायचे, त्यांची भव्यता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओत शनिवार वाड्याचा भव्य सेट बनवून हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. अर्जुन कपूर, कृती सेनन, मोहनीश बहल आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासह तब्बल 1300 डान्सर्सवर हे भव्यदिव्य गाणे चित्रीत करण्यात आले आहे. तब्बल 13 दिवस या गाण्याचे चित्रीकरण सुरु होते.
या गाण्याची वैशिष्ट्ये म्हणजे हे गाणे पेशव्याच्या काळातील वेशभूषा आणि दाग-दागिन्यांवर आधारित आहे. यात एक मोठी भव्य गणपतीची मूर्तीदेखील दिसते. गाण्यात 1300 डान्सर्स आहेत. त्यात पुण्यातील लेझीम आणि बूल डान्सर्सचा सहभाग आहे. आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांनी या गाण्यासाठी भव्य शनिवार वाड्याचा सेट तयार केला. तर हिंदी आणि मराठीचे शब्द असलेले हे गाणे अजय-अतुलने कंपोज केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.