Home | International | Pakistan | makki-is-in-pakistan

पाकमध्ये दहशतवादी मक्की दहा वर्षांपासून

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 03:16 PM IST

मक्की हा दहा वर्षांपासून पाकिस्तानातच तळ ठोकून आहे.

  • makki-is-in-pakistan

    इस्लामाबाद - मूळचा येमेनचा नागरिक असलेला व अल-कायदाचा सदस्य मक्की हा दहा वर्षांपासून पाकिस्तानातच तळ ठोकून आहे. तो तेथे संगणक तज्ज्ञ म्हणून काम करत होता. अलिकडेच त्याला पकडण्यात आले. त्यानंतर हा खुलासा झाला आहे. मोहम्मद अली कासिम उर्फ अबू शोएब अल-मक्की असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. लादेन मिशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी मक्कीला अबोटाबादमध्ये अटक करण्यात आली होती. तो कराचीत येण्यापूर्वी वझिरीस्तान, उत्तर वझिरीस्तान, पेशावर, फैसलाबाद येथेही राहीला.

Trending