Home | Maharashtra | Mumbai | Malad rain Accident 21 worker dead in wall collapse

मालाड दुर्घटना : आईला वाचवण्यास गेलेल्या श्रवणचा शाॅक लागून मृत्यू

विशेष प्रतिनिधी, | Update - Jul 03, 2019, 09:23 AM IST

मालाड परिसरात वन विभागाने उभारलेली एक संरक्षक भिंत साेमवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू

 • Malad rain Accident 21 worker dead in wall collapse

  मुंबई - मालाड परिसरात वन विभागाने उभारलेली एक संरक्षक भिंत साेमवारी मध्यरात्री कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला तर ७५ जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी राजकुमार गाैड यांनी सांगितले, रात्री ११.३० वाजेच्या सुमारास आम्ही आमच्या झाेपडीत झाेपायला जात हाेताे. त्याच वेळी अचानक वरील संरक्षक भिंत ढासळली व तिच्या मागे साचलेले पाणी आमच्या पत्र्याच्या शेडच्या घरात शिरले. वन विभागाने ही भिंत उभारली हाेती, मात्र पाणी जाण्यासाठी मार्गच ठेवला नव्हता. त्यामुळे पाण्याचा प्रचंड लाेंढा येऊन भिंत ढासळली व आमची घरे मलब्याखाली दबली गेली. हे संकट आेढावताच माझ्या कुटुंबातील मंडळी कसाबसे बाहेर पडू शकले. मात्र माझी ४२ वर्षीय आई मात्र घरातच अडकली. माझा छाेटा भाऊ श्रवण हा तिला वाचण्यासाठी गेला, मात्र पाय घसरल्याने ताे मलब्याखाली अडकला व पाण्यात पडला. यात विद्युत प्रवाह उतरला हाेता, त्यामुळे शाॅक लागून श्रवणचा जागीच मृत्यू झाला.


  लाेक जीव मुठीत घेऊन पळत हाेते
  प्रत्यक्षदर्शी धनंजय तिवारींनी सांगितले, साेमवारी मध्यरात्री मी माझ्या घरात हाेताे. अचानक मला लाेकांच्या आेरडण्याचा आवाज आला. खाली उतरून पाहिले तर ५०-६० लाेक बेभान हाेऊन पळत हाेते. मी विचारले तर एकाने सांगितले, ‘वन खात्याची संरक्षक भिंत ढासळली असून अनेक लाेक त्याखाली दबले आहेत.’ या दुर्घटनेत जे बचावले त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था आम्ही बांधकाम सुरू असलेल्या एका एसआरए इमारतीत केली. सकाळी नाष्ट्याची साेय केली.’


  बालिकेची झुंज अपयशी
  मालाडमधील भिंत काेसळून मलब्याखाली एक लहान मुलगी संचिता अडकली हाेती. तिच्या कुटुंबातील एक-दाेन लाेक दुर्घटनेच्या वेळी बाहेर हाेते. त्यांनी सांगितले, पत्नी व मुलगी रात्रीपासून मलब्याखाली अडकल्या आहेत. सकाळी ८ वाजता याबाबत माहिती मिळाली तेव्हा आम्ही संचिताला आवाज देऊन शाेधण्याचा प्रयत्न केला, तिनेही प्रतिसाद दिला. एनडीआरएफच्या टीमने तातडीने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुपारी १ वाजेपर्यंत ती जिवंत हाेती. मात्र नंतर काही वेळाने संचितासह तिची आई व अन्य एका मुलीचा मृतदेह सापडला, असे प्रत्यक्षदर्शी किसन सिंह यांनी सांगितले.

Trending