आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Malaika Arjun Reaches Out To Meet Arman Jain With Greetings, Ranbir Seen With Girlfriend Alia And Mother Neetu

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलायका - अर्जुनने एकत्र पोहोचून दिल्या अरमान जैनला शुभेच्छा, रणबीर गर्लफ्रेंड आलिया आणि आई नीतू यांच्यासोबत दिसले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : मंगळवारी रात्री राज कपूरयांचा नातू म्हणजेच त्यांची मुलगी रीमा जैनचा मुलगा अरमानची कॉकटेल पार्टी होस्ट केली गेली. पार्टीमध्ये रणबीर कपूर गर्लफ्रेंड आलिया भट्ट आणि आई नीतू सिंह यांच्यासोबतडिसला तर मलायका अरोरा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत सोहळ्यात सामील झाली. जैन-कपूर कुटुंब आणि आणि त्यांच्या इतर नातेवाइकांप्रमाणे शाहरुख खान पत्नी गौरीसोबत या पार्टीमध्ये पोहोचला तर मुकेश अंबानी पत्नी नीता, मुलगा आकाश, सून श्लोका, मुलगा अनंत आणि त्याची मैत्रीण राधिका मर्चन्टसोबत दिसला. 

हे सेलिब्रिटी दिसले पार्टीमध्ये... 

पार्टीमध्ये टीना अंबानी, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, तारा सुतारिया, किआरा आडवाणी, रेखा, रानी मुखर्जी, वरुण धवन, अनिल कपूर, सोनम कपूर आणि इंग्लिश बिझनेस वुमन आणि अभिनेत्री एलिजाबेथ हर्ले यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी ही पार्टी अटेंड करून अरमान आणि त्याची पत्नी अनीशाला शुभेच्छा दिल्या. अरमानने सोमवारी दिल्ली बेस्ड डिझायनर अनीशा मल्होत्रासोबत लग्न केले आहे. हे लग्न मुंबईच्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये झाले होते आणि इथेच रिसेप्शनदेखील होस्ट केले होते.  

7 आठवड्यांपूर्वी झाला होता अरमान-अनीशाचा साखरपुडा... 

अरमान आणि अनीशायांची मेहंदी सेरेमनी शनिवारी झाली होती. तर रविवारी त्यांची संगीत सेरेमनी झाली, ज्यामध्ये श्वेता बच्चन नंदा आणि सुनील शेट्टी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सामील झाले होते. सांगितले जाते की, कपलचा साखरपुडा सुमारे 7 आठवड्यांपूर्वी झाला होता.