Home | Gossip | malaika arora and arjun kapoor attended a party together

अभिनेत्याच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये एकाच कारमधून आले मलायका-अर्जुन, दोघांनी घातले होते सेम कलरचे ड्रेस, कॅमेरा पाहून चेहरा लपवू लागली  मलायका

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 11, 2019, 05:06 PM IST

मालदीवहुन परतल्यावर पहिल्यांदा सोबत दिसले मलायका-अर्जुन... 

 • malaika arora and arjun kapoor attended a party together

  मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरयांच्या अफेयरच्या बातम्या सध्या सर्वात जास्त चर्चेत आहेत. अशातच कपल व्हॅकेशनसाठी मालदीवला गेले होते. जेथून मलायकाने काही फोटोज आणि व्हिडीओज शेयर केले होते. याचदरम्यान बुधवारी रात्री चंकी पांडेच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये मलायका आणि अर्जुन एकाच कारने पोहोचले होते. खास गोष्ट ही आहे की, पार्टीमध्ये दोघेही सेम कलर (ब्लू) चे ड्रेस घालून आले होते. मलायकाची नजर जशी मीडियाच्या कॅमेऱ्यावर पडली. तसा आपला चेहरा लपवण्याचा पर्यटन केला. मात्र तरीही दोघे मीडियाच्या नजरेपासून लपण्याच्या प्रयत्न करत होते.

  मालदीवहुन परतल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले कपल...
  मालदीवहुन परतल्यानंतर पहिल्यांदा हे कपल एकत्र दिसले. यापूर्वी जेव्हा मलायकाने आपले फोटोज शेयर केले होते, तेव्हा सोशल मीडिया यूजर्सने प्रश्न विचारला होता की, हे फोटो कोण काढीत आहे ? नंतर अर्जुन कपूरने मालदीवहुन आपला फोटो स्वतः शेयर करत याचा खुलासा केला की, तो स्वतः तिथे होता.

  अर्जुनसोबत नाते स्वीकारले आहे मलायकाने...
  मलायका अरोराने इशाऱ्यातच का होईना पण अर्जुन कपूरसोबतचे नाते स्वीकारले आहे. 'कॉफी विद करण' मध्ये मलायकाने सांगितले होते की, ती कुणासोबततरी रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका आणखी एका स्टेटमेंटमध्ये म्हणाली होती की, तिला अर्जुन आवडतो असाही आणि तसाही. जर हे सर्व स्टेटमेंट्स पहिले गेले तर याने हेच सांगितले जाऊ शकते की, हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.

  लग्नासाठी तयार आहे अर्जुन...
  अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा इव्हेंट्समध्ये एकत्र दिसतात. मीडियामध्ये त्यांचे फोटोज खूप व्हायरल होत आहेत. तरीही त्यांनी मीडियासमोर अद्याप आपले नाते स्वीकारलेले नाही. मागे जेव्हा अर्जुन करण जोहरच्या चॅट शो कॉफी विद करणमध्ये गेला होता तेव्हा तो म्हणला होता - आता मी लग्नासाठी तयार आहे.'

Trending