आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरबरोबर \'बीट पे बुटी\' गाण्यावर हॉट डान्स करताना दिसली मलायका, हात पकडून घेऊन गेला अर्जुन कपूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमानची एक्स भाभी असलेली मलायका अरोरा (23 ऑक्टोबर) वर्षांची झाली आहे. तिच्या बर्थ डे लाच तिचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ती तिचा तछाकथित बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबरोबर हॉट डान्स करताना दिसत आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या मंचावर मलायका आणि अर्जुन यांनी 'बीट पे बूटी' गाण्यावर डान्स केला. त्यावेळी त्यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय ठरत आहे. 


एकमेकांच्या हातात हात पकडून होते मलायका-अर्जुन...
अर्जुन कपूर नुकताच या शोवर 'नमस्ते इंग्लंड' च्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी होस्ट भारतीने मलायका आणि अर्जुनला स्टेजवर बोलावले. तेव्हा त्यांनी हा डान्स केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या शोच्या शूटदरम्यान अर्जुन आणि मलायका एकमेकांबरोबरच होते. त्यांनी मिनिटभरासाठीही एकमेकांना एकटे सोडले नाही.


अनेकदा एकत्र झळकले 
मलायका आणि अर्जुन अनेकदा एकत्र दिसले आहेत. पण त्यांनी अफेयरबाबत कधीही काही मान्य केले नाही. काही दिवसांपूर्वीच एका पार्टीतून निघताना ते एका कारमध्ये झळकले होते. एका शोमधून बाहेर पडताना एकमेकांच्या हातात हात घेऊन असल्याचे पाहायला मिळाले. 


मलायकामुळे बिघडले सलमान अर्जुनचे नाते 
मलायका सलमानची एक्स बहिणी आहे. अरबाजशी घटस्फोटाचे कारण अर्जुनशी तिची जवळीक हेही समजले जाते. त्यावरूनच सलमान आणि अर्जुनचे नाते बिघडल्याचीही चर्चा आहे. सलमान सोनमच्या रिसेप्शनला पोहोचला तेव्हा त्याने अर्जुनला टाळल्याचे पाहायला मिळाले होते. एकेकाळी सलमानची छोटी बहीण अर्पितालाही अर्जुन डेट करत होता. पण त्यांचे ब्रेक अप झाले. 


घटस्फोटानंतर जास्त सुखी 
मलायकाने नुकतेच एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की, अरबाजशी वेगळी झाल्यानंतर ती आता अधिक शांत आणि चांगले फील करत आहे. मी आता अधिक सुखी असल्याचे ती म्हणाली होती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...