• Home
  • Malaika Arora and Arjun Kapoor Getting Trolled After Dinner Date

12 वर्षांनी लहान / 12 वर्षांनी लहान अर्जुन कपूरसोबत डेट करतेय मलायका, सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2018 03:09:00 PM IST

मुंबई- अर्जुन कपूर मंगळवारी रात्री त्याच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठ्या असलेल्या मलाइका अरोरासोबत डिनर करताना दिसला. सोशल मीडियावर दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अर्जुन हा मलाइका हिचा बचाव करताना दिसतो. अर्जुन स्वत: मलाईका हिला तिच्या कारपर्यंत घेऊन जातो. तिला सीटवर बसविल्यानंतर तो दुसऱ्या सीटवर बसतो.

युझर्स करताहेत ट्रोल...

- अर्जुन आणि मलाईकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युझर्स त्यांना ट्रोक करत आहेत. मलाइका ही तिच्यापेक्षा तब्बल 12 वर्षांनी लहान अर्जुनसोबत डेट करत असल्याने तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

लिव्ह इन रिलशनमध्ये राहायचे आणि नंतर सोडून द्यायचे

एका युझर्सने आपल्या कमेंटमध्ये लिहिले की, अशा वृत्तीच्या सिनेतारकांना सिनेसृष्टीतून काढून टाकायला हवे. कोणी कोणासोबतही डेट करू शकतो, लग्न करू शकतो, असा संदेश हे दोघे देत आहेत. काही अभिनेत्री आपल्या मुलाच्या वयाच्या अभिनेत्यासोबत डेट करत आहेत. काही लिव्ह इन रिलशनमध्ये राहायचे आणि नंतर सोडून द्यायचे. मॉडर्न असल्याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी कसेही वागावे, असेही या युझर्सने म्हटले आहे.

मलाईकाने तिच्या नावासमोरुन 'खान' काढून टाकावे..

मलाईकाने आपल्या नावासमोर असलेले खान हे आडनाव काढून टाकायला हवे, असेही एका युझर्सने म्हटले आहे. आता तिला नावासमोर खान लावायचा कोणताही अधिकार नाही. तिच्या अशा वर्तवणुकीमुळे खान खराब होत आहे.

बोनी कपूरही आहेत नाराज...

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूरचे वडील बोनी कपूर हे देखील त्याच्यावर नाराज आहेत. अर्जुन आणि मलाईकाच्या रिलेशनवर ते लक्ष ठेवून आहेत. अर्जुन आणि मलाईकाच्या अशा वागण्याने सिनेसृष्टीतील ‍दिग्गज खान कुटुंबियांसोबत असलेले संबंध खराब होतील, ही चिंता बोनी कपूर यांना सतावते आहे. बोनी कपूर आणि सलमानमध्ये जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अर्जुनला समजावण्याचा बोनी कपूर यांनी अनेकदा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मलाईका ही अर्जुनची बहीण अंशु हिची चांगली मैत्रिण आहे. दोघी बराच वेळ घरी सोबतच असतात.

X
COMMENT