आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच 19 एप्रिलला मलायकासोबत लग्न करणार आहे का अर्जुन कपूर ? बातमी ऐकून भडकलेल्या बोनी कपूर यांनी दिली ही प्रतिक्रिया 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर मागील काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांच्या लग्नाबद्दल अनेकदा बातम्या येत असतात. अशातच बातमी आली आहे की, कपल पुढच्या महिन्यात 19 एप्रिलला खिश्चन रीतिरिवाज प्रमाणे लग्न करणार आहेत. मात्र लग्नाच्या या बातमीवर अर्जुन किंवा मलायका यांच्याकडून कोणतेही ऑफिशिअल कन्फर्मेशन आलेले नाही. पण अर्जुनचे पिता बोनी कपूर या बातमीवर भडकले आहेत. बोनी कपूर यांनी अर्जुन आणि मलायका यांच्या लग्नाच्या बातमीला एक अफवा असल्याचे सांगतले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामध्ये जराही सत्य नाही. 

अर्जुनने लग्नाविषयी सांगितले तर आम्हीही सामील होऊ....
दुसरीकडे, कपूर कुटुंबियांच्या एका व्यक्तीचे म्हणणे आहे की, अर्जुनने आत्तापर्यंत आम्हालाही लग्नाबद्दल काहीही सांगितले नाही. जेव्हा तो आम्हाला सांगेल की, तो लग्न करणार आहे. तेव्हा आम्हीही त्याच्या लग्नात सामील होऊ. मात्र तोपर्यंत अर्जुनला त्याच्या लग्नाचा निर्णय घेण्यासाठी एकटे सोडले पाहिजे. बातम्या तर अशाही आहेत की, लग्नात सामील होण्यासाठी करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांच्याव्यतिरिक्त रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांना आमंत्रणही पाठवले गेले आहे. एवढेच नाही तर दोघांनीही आपल्या कर्मचाऱ्यांनाही पूर्णपणे गुप्तता पाळण्याची ताकीद दिली आहे. मलायकाचे जिथे हे दुसरे लग्न असेल तर अर्जुन कपूरचे पहिलेच. दोघांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. 

मला अर्जुन आवडतो...असाही आणि तसाही...  
काही दिवसांपूर्वी करण जोहरने 'कॉफी विद करन' च्या एका एपिसोडचा प्रोमो लॉन्च केला होता. या एपिसोडसाठी विशेषतः ज्यूरीसाठी चार लोक किरण खेर, मला यका अरोरा, वीर दास आणि मल्लिका दुआ यांना शोमध्ये बोलावले गेले होते. त्यांच्याशी बातचितीदरम्यान करणने विचारले की, सर्वात चांगला परफॉर्मन्स कुणाचा आहे ? उत्तरात किरण अर्जुन कपूरचे नाव घेतात. तर वीर दास आणि मल्लिका दुआ रणवीर सिंहचे नाव घेतात. पण हैराण करणारे उत्तर येते मलायकाचे. ती म्हणते, "मला अर्जुन आवडतो...असाही आणि तसाही" मलायकाचे उत्तर ऐकून बाकीचे जूरी मेंबर्स हैरान होतात तर होस्ट करण  जोहरदेखील शॉक होतो. 

16 वर्षांच्या मुलाची आई आहे मलायका... 
मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाजसोबत 1998 मध्ये लग्न केले होते. मात्र कपलचे मे 2017 मध्ये घटस्फोट झाला होता. दोघांचाही एक 16 वर्षांचा मुलगा आहे - अरहान. मलायकाशी घटस्फोट झाल्यांनतर अरबाज आता जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...