Home | Gossip | malaika arora and arjun kapoor spotted in front of hospital

मालदीवला हॉलिडे एन्जॉय करून परतलेले मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पोहोचले हॉस्पिटलमध्ये, फोटोज झाले व्हायरल  

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 03:59 PM IST

दवाखान्याबाहेर फोटोग्राफर्सला पाहून अर्जुन-मलायकाने राहिले एकमेकांपासून दूर-दूर... 

 • malaika arora and arjun kapoor spotted in front of hospital

  मुंबई : अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचे काही फोटोज समोर आले आहेत. ज्यामध्ये ते मुंबईच्या एका हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाले. दोघे सोबत एकाच गाडीतून उतरतांना दिसले. असे सांगितले जात आहे की, ते घरच सोबत हॉस्पिटलची निघाले होते. मात्र जेव्हा त्यांनी तेथे मीडियाला पहिले, तेव्हा ते एकमेकांपासून दूर दूर होऊन चालू लागले.

  कॅज्युअल लुकमध्ये दिसला अर्जुन...
  यादरम्यान अर्जुन कॅज्युअल लुकमध्ये दिसला आणि मलायकाने टी-शर्टसोबत जीन्स घातली होती. दोघांनाही हॉस्पिटलमध्ये पाहिल्यानंतर सर्वांच्याच मनात एक प्रश्न फिरत आहे की, ते तेथे का गेले असावे ? मात्र अद्याप या गोष्टीचा काहीही खुलासा होऊ शकला नाही. पण असे सांगितले जात होते की, अशातच त्यांच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत आणि ते दोघे मालदीवला सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठीही गेले होते. तर दवाखान्याच्या व्हिजिटचा याच्याशी काहीतरी संबंध असावा.

  मलायकाने लिहिली होती 'सोलमेट' पोस्ट...
  अभिनेत्रीने अशातच विना नावाची एक 'सोलमेट' पोस्ट लिहिली होती, "जवळची व्यक्ती, ज्याला पहिल्यांदा भेटूनच त्याच्यासोबत एक कनेक्शन जाणवते. ज्यामुळे तुम्ही असे अरेक्ट होता जसे यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. हे कनेक्शन वेळेनुसार अजूनच दृढ होत जाते आणि तुमचे प्रेमही त्यासाठी वाढत जाते. एवढे वाढते की, तुम्ही यापूर्वी कधीच कुणावर तेवढे प्रेम केलेले नसते."

Trending