Home | News | malaika arora and arjun kapoor spotted once again in a party

पुन्हा एकदा एकत्रित स्पॉट झाले मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर, मीडियापासून लपण्याचा केला प्रयत्न

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 13, 2019, 12:27 PM IST

लग्न जरी टाळले असले तरी दोघांमधील प्रेम कमी झाले नाही

 • malaika arora and arjun kapoor spotted once again in a party

  बॉलीवूड डेस्क - मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी कुटुंबीयांच्या दबावामुळे आपले लग्न जरी टाळले असले तरी या दोघांमधील प्रेम कमी झाले नाही. शनिवारी उशिरा रात्री या दोघांना एकमेकांसोबत पाहण्यात आले. दोघेही पार्टीतून एकमेकांसोबत बाहेर आले होते. पण मीडिया कॅमेरे पाहताच दोघेही त्यांच्यापासून बचाव करताना दिसले. या पार्टीत मलायका-अर्जुन यांशिवाय अनेक सेलिब्रिटि आले होते. यामध्ये करिना कपूर, सैफ अली खान, रिया कपूर यांसारखे स्टार्स सहभागी होते.


  सुंदर ड्रेसमध्ये दिसली मलायका

  यादरम्यान मलायका अति सुंदर दिसत होती. तिने थाई-हाई कट ड्रेस परिधान केला होता. तर अर्जुन ब्लू आणि ब्लॅक आउटफिट मध्ये दिसून आला. मीडियापासून दूर राहण्यासाठी दोघेही वेगवेगळे पार्टीतून बाहेर आले होते. पण तरीही ते मीडियापासून बचाव करू शकले नाही.

  मलायका-अर्जुनसोबत करिना आणि सैफ देखील पार्टीतून सोबतच बाहेर आले होते. यादरम्यान करिना ब्लू जंपसूट तर सैफ ब्लॅक टी-शर्टमध्ये दिसून आला.

 • malaika arora and arjun kapoor spotted once again in a party
 • malaika arora and arjun kapoor spotted once again in a party

Trending