आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलायका अरोरा आणि अर्जुन कपुरच्या लग्नाची तारीख ठरली, या दिवशी ख्रिश्चीयन पद्धतीने विवाह बंधनात अडकणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एंटरटेन्मेंट डेस्क- मलायका अरोरा आणि अर्जुन कपुर अनेद दिवसांपासून एकमेंकांना डेट करत आहेत. त्या दोघांच्या लग्नाबद्दल अनेग दिवसांपासून चर्चा सुरू होती, पण आता दोघांबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. माहिती अशी आहे की, त्या दोघांनी पुढील महिन्यात 19 एप्रिलला लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, या लग्नाबद्दलची निश्चिती त्या दोघांकडून आलेली नाहीये. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार अर्जुन आणि मलायका आपल्या नात्याला नाव देण्यासाठी लग्न करणार आहेत. ते दोघेही ख्रिश्चीयन पद्धतीने लग्न करणार आहेत.

 


- सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या दोघांनीही खूप कमी लोकांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे. या लग्नात त्यांचे क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सच सामिल होतील. अशी माहिती समोर आली आहे की, लग्नात करीना कपूर आणि करिश्मा कपूर तसेच रणवीर सिंह - दीपिका पादुकोण यांना निमंत्रण देण्यात आले आहे. त्या दोघांनीही आपल्या कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही माहिती मीडियात लीक करण्यापासून मज्जाव केला आहे. मलायकाचे हे दुसरे लग्न आहे तर अर्जुनचे पहिले. अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्ष लहान आहे.

 


अर्जुनसोबतच्या रिलेशनवर केले होते भाष्य
45 वर्षीय मलायकाने काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्ह्यूमध्ये अर्जूनसोबतच्या रिलेशनवर भाष्य केले होते. तिने स्पष्टपणे तर आपले मत मांडले नाही, पण तिच्या थोड्याशा बोलण्यातून सगळ काही स्पष्ट झाले होते. ती म्हणाली- 'मी कधीच खासगी प्रश्नांची उत्तरे देत नाही, त्याचा अर्थ असा नाही की, मला माझ्या खासगी आयुष्याबद्दल बोलायला लाज वाटते. पण मला माझ्या खासगी आयुष्याव बोलताना कंम्फर्टेबल वाटत नाही. माझ्या आयुष्यात काय होत आहे हे सगळ्यांना माहित आहे. मला कोणालाच काही सांगायची गरज नाहीये. मी माझे आयुष्य एन्जॉय करत आहे.'

 


16 वर्षाच्या मुलाची आई आहे मलायका
मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाद खानसोबत 1998 मध्ये लग्न केले होते. पण, त्यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्या दोघांना एक 16 वर्षीय मुलगा अरहान आहे. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...