आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टटेन्मेंट डेस्क. 12 वर्षे मोठा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत मलायका अरोरा पुन्हा एकदा लेट नाइट पार्टी करताना स्पॉट झाली. पार्टीमध्ये मलायकासोबतच अमृता अरोरा, गौरी खान, करिश्मा कपूर, सीमा खानही होते. या पार्टीमध्ये अर्जुन एकमेव मेल पर्सनल होता. मलायका-अर्जुनची केमिस्ट्री पाहून कळतेय की, आता हे दोघं जगाची काळजी न करता एन्जॉय करत आहेत. अर्जुन मीडिया फोटोग्राफर्स समोरच मलायकाला प्रोटेक्ट करताना दिसला. या निमित्ताने मलायकाने व्हाइट रंगाचा बॅकलेस ड्रेस घातला होता. तर अर्जुन ब्लॅक जीन्स आणि ब्लॅक ब्लू चेक शर्टमध्ये होता. यापुर्वीही दोघं ब-याच वेळा एकत्र दिसले आहेत. पण दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी अजून कमेंट केलेली नाही. दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहून यूजर्स खुप खिल्ली उडवत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'लेडिजसोबत वॉचमॅन' तर एकाने लिहिले की, - 'मलायका ड्रेससोबत टॉप घालणे विसरली वाटतं.' एकाने लिहिले - 'महिलांसोबत हा एकटा पुरुष काय करतोय' एकाने लिहिले 'कोणत्याच अँगलने हा अॅक्टर वाटत नाही.'
पर्सनल प्रश्नांवर उत्तर देत नाही - मलायका
45 वर्षांच्या मलायकाने काही महिन्यांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये अर्जुनसोबत रिलेशनशिपवर बोलली होती. तिने स तर काही नाही सांगितले पण जेवढे काही बोलली त्यात बरेच काही सांगून गेली.
- मलायकाने सांगितले होते, 'मी कधीच पर्सनल प्रश्नांना उत्तरे देत नाही. याचा अर्थ हा नाही की मला पर्सनल लाइफबद्दल बोलायला लाज वाटते. पण मी माझ्या पर्सनल लाइफबद्दल बोलायला कंम्फर्टेबल फील करत नाही'.
- ती म्हणाली होती, 'माझ्या आयुष्यात काय चालू आहे आणि काय नाही हे सर्वांनाच माहित आहे. मला स्वतः याबाबतीत कुणालाच काहीही सांगण्याची गरज नाही. मी माझी लाइफ एन्जॉय करत आहे'.
16 वर्षांच्या मुलाची आई आहे मलायका...
मलाइकाने सलमान खानचा भाऊ अरबाजसोबत 1998 मध्ये लग्न केले होते. मात्र, कपलचा घटस्फोट 2017 मध्ये झाला. दोघांना 16 वर्षांचा एक मुलगा आहे, अरहान. मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाज आता जियॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.