आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील रस्त्यांवर ऑटोरिक्षात दिसली मलायका, रिक्षावर लागलेला एप्पलचा लोगो बघून सोशल मीडिया यूजर्स म्हणाले- अरे वा... हिचा तर ऑटोसुद्धा Apple चा आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः मलायका अरोरा अलीकडेच मुंबईच्या रस्त्यांवर ऑटोरिक्षातून फेरफटका मारताना दिसली. यावेळी तिची मैत्रीण एकता कॉल तिच्यासोबत होती. मलायका रविवारी रात्री ख्रिसमस पार्टीत पोहोचली होती. पार्टीतून परतत असताना तिने कारऐवजी ऑटोरिक्षाची निवड केली. मलायका ज्या ऑटोतून प्रवास करत होती, त्यावर एप्पलचा लोगो होतो. तो बघून सोशल मीडिया यूजर्स आता तिची खिल्ली उडवत आहेत. यूजर्स म्हणाले, मलायकाचा ऑटोसुद्धा Apple ब्रॅण्डचा आहे. 

 

झाले असे की, रविवारी रात्री दिग्दर्शक रितेश सिधवानी यांनी त्यांच्या घरी प्री-ख्रिसमस पार्टीत मलायका अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती. खास गोष्ट म्हणजे जेव्हा मलायका अर्जुन  कपूरसोबत ज्या कारमध्ये होती त्याच कारमध्ये अर्जुनचे काका-काकू संजय कपूर आणि महीप कपूरसोबत सोबत होते. मलायकाची अर्जुनच्या काका-काकूंसोबत चांगली बाँडिंग दिसली. बातम्यांनुसार, अर्जुन आणि मलायका पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न करु शकतात. पार्टीत अरबाज त्याची गर्लफ्रेंड जॉर्ज‍ियासोबत पोहोचला होता. सोबतच अमृता अरोरा, रणवीर सिंह, जोया अख्तर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, तुषार कपूर यांनीही हजेरी लावली होती.

 
गेल्यावर्षी हॉलिडेवर गेले होते मलायका-अर्जुन

- मलायकाने तिचा 45 वा बर्थडे (23 ऑक्टोबर) सेलिब्रेट करायला इटलीत गेली होती. या हॉलिडेवर अर्जुन कपूर तिच्यासोबत होता. इटलीहून अर्जुन आणि मलायकाचा एक फोटो समोर आला होता, त्यामध्ये दोघे हातात हात घालून फिरताना दिसले होते. हा फोटो मिलान (इटलीतील शहर) एअरपोर्टचा होता.


- फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु झाली होती. व्हेकेशनहून परतत असताना दोघे एकाच फ्लाइटने भारतात परतले होते. पण मुंबई एअरपोर्टवर फोटोग्राफर्सना बघून दूर दूर झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...